मुंबई, 14 डिसेंबर- अंकिता लोखंडे आणि विकी जैन आज विवाहबंधनात (Ankita Lokhande Vicky Jain Wedding) अडकणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये दोघांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू आहेत. काल रात्री संगीत सेरेमनी पार पडली. यात अंकिताच्या अनेक टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही अंकिताच्या संगीत सेरेमनीला हजेरी लावली होती. यादरम्यान तिने अंकिता आणि विकीसोबत खूप मजा केली.त्यांचे फोटो आणि व्हिडिओ कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केले होते.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी लग्नापूर्वी रिसेप्शनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. विकी आणि अंकिता लग्नानंतर रिसेप्शन पार्टी देणार नाहीत. कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा विषाणू खूप वेगाने पसरत आहे आणि देशातील अनेक लोकांना याची लागण झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अंकिता आणि विकीचा रिसेप्शन प्लॅन रद्द करण्यात आला आहे.
आता फक्त अंकिता आणि विकीचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील जवळच्या लोकांना लग्नाचे आमंत्रण दिले होते. त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही आमंत्रित केले होते. त्यांच्यासोबतचा फोटोही त्यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता.
अंकिता लोखंडेचे लग्न बिलासपूर येथील कोळसा उद्योजकाचा मुलगा विक्की जैनसोबत होत आहे. विकी हा देखील व्यावसायिक असून व्यवसायानिमित्त तो बहुतांश वेळ मुंबईत राहतो. व्यवसायाच्या संदर्भात त्याची अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत ओळख झाली होती. भेटीगाठी आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ankita lokhande, Entertainment