मुंबई 5 जून**:** नागिण (Naagin) या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता पर्ल व्ही पुरी (Pearl V Puri) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका तरुणीनं त्याच्यावर चक्क बलात्काराचे आरोप केले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. (Pearl V Puri in rape case) दरम्यान या प्रकरणात आता अभिनेत्री अनिता हसनंदानी हिनं उडी घेतली आहे. तिनं अभिनेत्याची बाजू घेत त्याच्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा दावा केला आहे. अनितानं पर्लसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सोबतच त्याला पाठिंबा देणारी एक प्रतिक्रिया देखील लिहिली आहे. “सकाळी उठल्या-उठल्या ही थक्क करणारी बातमी वाचली. बातमी पाहून डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी त्याला ओळखते. तो असं काहीही करु शकत नाही. त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. पर्ल तू घाबरु नकोस सत्य लवकरच समोर येईल.” अशा आशयाची पोस्ट लिहून तिनं अभिनेत्याची बाजू घेतली. यापूर्वी एकता कपूरनं देखील त्याला पाठिंबा देणारी पोस्ट लिहिली होती. यामध्ये तिनं तरुणीचे वडिल अभिनेत्याला फसवत असल्याचे आरोप केले होते. ‘पर्ल विरोधात कट रचला गेलाय’; बलात्कार प्रकरणी एकता कपूरनं घेतली अभिनेत्याची बाजू
‘देवमाणसा’ने खरोखर खाल्ला होता मार? ACP चा मार खाऊन हवालदिल झाला डॉक्टर पर्ल व्ही पुरी हा छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यानं आतापर्यंत बेपनाह प्यार, ब्रह्मराक्षस 2, नागिन 3, ‘नागार्जुन एक योद्धा’ यांसारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही काळात तो नागिन या मालिकेमुळं प्रचंड चर्चेत होता. सोशल मीडियावर देखील त्याची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या अटकेमुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.