मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘देवमाणसा’ने खरोखर खाल्ला होता मार? ACP चा मार खाऊन हवालदिल झाला डॉक्टर

‘देवमाणसा’ने खरोखर खाल्ला होता मार? ACP चा मार खाऊन हवालदिल झाला डॉक्टर

शुटिंग दरम्यान दिव्याने असा दिला होता देवी सिंगला चोप

शुटिंग दरम्यान दिव्याने असा दिला होता देवी सिंगला चोप

शुटिंग दरम्यान दिव्याने असा दिला होता देवी सिंगला चोप

  • Published by:  News Digital

मुंबई 5 जून : झी मराठी (Zee Marathi) वरील सर्वाधिक चर्चेत असणारी मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) आता वेगळ्या ट्प्प्यावर येऊन पोहोचली आहे. ज्या गुन्हेगाराचा पोलिस करून शोध घेत होते अखेर त्याच्या हातात आता बेड्या पडल्या आहेत. आणि तो गजाआड देखील झाला आहे.

दिव्या सिंगने अगदी भर लग्नात देवी सिंगला (Devi singh) अटक केली तसेच त्याला बेदम मार ही दिला. हे सगळं चित्र पडद्यावर अगदी हुबेहूब रंगवलं गेलं आणि प्रेक्षकांनीही त्याचा आस्वाद घेतला. पण हे सगळं चित्र रंगवताना अर्थात चित्रिकरण करताना कलाकारांना अफाट मेहनत घ्यावी लागली होती. तर हा मार खरा वाटावा यासाठी काही फटके ही सोसावे लागले होते.

या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेकअप आणि वेशभूषा. याचा एक व्हिडीओ देवमाणूस म्हणजेच अभिनेता किरण गायकवाडने शेअर केला आहे. सगळं काही नैसर्गिक आणि खर वाटावं यासाठी मेहनत घेतली गेली होती. तसेच अभिनयातूनही कलाकरांनी ते दाखवून दिलं.

सोनालिका झाली माधवी भाभी; मराठी अभिनेत्रीला कसं मिळालं 'तारक मेहता'मध्ये काम?

अंगावरील कपडे फाडले गेले, चेहऱ्यावर मेकअप लावण्यात आला तर जमिनीवर झोपून मारही खावा लागला. अर्थात हा सगळा चित्रिकरणाचा भाग होता. किरणने हा व्हिडीओ शेअर करत  पडद्यामागचे काही क्षण सांगितले आहेत. (Devmanus serial behind the scenes)

गेले अनेक दिवस प्रेक्षक या दिवसाची वाट पाहत होते. पण डॉक्टर प्रत्येकवेळी पोलिसांना चकवा देत होता. अखेर आता तो जेलमध्ये गेला आहे. पण अजूनही त्याने गुन्हा कबुल केलेला नाही. व तो पोलिसांवरच हसत आहे. तसेच तो आता डिम्पलच्या (Dimple) मदतीने पुन्हा एकदा सुटण्याचा प्रयत्न करत आहे. व गावातील सगळे लोक हे त्याच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. डॉक्टर खरच डिम्पलच्या मदतीने बाहेर येणार का हे पाहण महत्त्वाचं ठरेल.

First published:

Tags: Marathi entertainment, Zee marathi serial