मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alka Kubal : 'ऑनस्क्रिन सोशिक असल्या तरी प्रत्यक्ष मात्र...'; मिलिंद गवळींनी केला अलका ताईंबाबत मोठा खुलासा

Alka Kubal : 'ऑनस्क्रिन सोशिक असल्या तरी प्रत्यक्ष मात्र...'; मिलिंद गवळींनी केला अलका ताईंबाबत मोठा खुलासा

अलका कुबल मिलिंद गवळी

अलका कुबल मिलिंद गवळी

अभिनेते मिलिंग गवळींनी अलका कुबल यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात अलका ताई प्रत्यक्षात कशा आहेत याविषयी त्यांनी लिहिलं आहे.

  मुंबई,  23 सप्टेंबर: माहेरची साडी हा सिनेमा महाराष्ट्रातच नाही देशाबाहेरही घेऊन जाणाऱ्या आणि सर्वांच्या डोळ्यातून आपसूक पाणी आणणाऱ्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री अलका कुबल यांचा आज वाढदिवस. 'चक्र' या सिनेमातून त्यांनी फार कमी वयात सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून अलका ताईंनी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. आज सगळेच अलका ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.  त्यांचं भरभरुन कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे अभिनेते मिलिंद गवळी यांनी अलका ताईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  ज्यात त्यांनी खऱ्या आयुष्यात अलका ताई नेमक्या कशा आहेत याचा खुलासा केला आहे. मिलिंद आणि अलका ताईंची यांची फार जुनी ओळख आहे. दोघांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी त्यांनी शेअर केल्यात वेळप्रसंगी एकमेकांना मदत केली आहे. आज अलका ताईंच्या वाढदिवसानिमित्ता मिलिंद यांनी फार सुंदर पोस्ट शेअर केली आहे. हेही वाचा - Alka Kubal B'day: 'हा' आहे अलका कुबल यांचा वीक पॉईंट; ज्येष्ठ अभिनेत्रीने स्वतः केलाय खुलासा मिलिंद गवळी यांनी म्हटलंय, 'अलकाताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अलकाताई म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील झाशीची राणी, माहेरची साडी लेक चालली सासरला यात सोशिक आपला नारी ची भूमिका करणारी अलकाताई, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्या दबंग आहे, वाघीण आहे त्या वाघीण, कोणाचेही बापाला न घाबरणारी, चांगल्याशी खूपच चांगलं आणि वाईट अशी एकदम वाईट, आपल्याला मोठी बहीण असली की कसा तिचा आधार वाटतो आपल्याला, मलाही या रूथलेस फिल्म इंडस्ट्रीमध्ये अलकाताईचा खूप आधार मिळाला आहे'.
  मिलिंग यांनी पुढे लिहिलयं, 'असंख्या सिनेमांमध्ये आम्ही एकत्र काम केलं, समीर आणि त्यांच्या होम प्रोडक्शन मध्ये घरचा माणूस म्हणून त्यांनी मला सतत घेतलं. या फिल्म इंडस्ट्री मध्ये खूप कमी माणसं आपली फॅमिली होतात. अलकाताई माझी फॅमिली आहे. आज अलकाताईंच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद.' या पोस्टसह मिलिंद यांनी अलका ताईंबरोबरच्या अनेक जुन्या आठवणी फोटोंच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या