जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / लांब केस अन् रक्तानं माखलेली कुऱ्हाड, Animal च्या धांसू टीझरमध्ये रणबीरचा वेगळाच अवतार

लांब केस अन् रक्तानं माखलेली कुऱ्हाड, Animal च्या धांसू टीझरमध्ये रणबीरचा वेगळाच अवतार

Animal च्या धांसू टीझरमध्ये रणबीरचा वेगळाच अवतार

Animal च्या धांसू टीझरमध्ये रणबीरचा वेगळाच अवतार

बॉलिवूड़ अभिनेता रणबीर कपूरच्या द रोअर ऑफ “अ‍ॅनिमल” या सिनेमाची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक अतुर होते. आता रणबीरच्या या बहुचर्चित द रोअर ऑफ “अ‍ॅनिमल” सिनेमाचा प्री - टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जून- बॉलिवूड़ अभिनेता रणबीर कपूरच्या द रोअर ऑफ “अ‍ॅनिमल” या सिनेमाची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक अतुर होते. आता रणबीरच्या या बहुचर्चित द रोअर ऑफ “अ‍ॅनिमल” सिनेमाचा प्री - टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि लेखक-दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचा हा सिनेमा आहे. या सिनेमात रणबीरचा वेगळाच अवतार पाहायला मिळतं आहे. “अ‍ॅनिमल” या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा एक रोमांचक प्री-टीझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये सिनेमाच्या मनमोहक जगाची आणि थरारक कथेची झलक दाखवण्यात आली आहे. वाचा- ‘ड्रग्ज घेणाऱ्याने रामाची भूमिका….’ . कंगनाचा रणबीर कपूरवर जोरदार निशाणा पांढरा शर्ट आणि पांढरी धोती , लांब केस, दाढी आणि हातात कुऱ्हाड घेऊन रणबीरची एकदम धांसू एंट्री होते. मास्कमध्ये असलेल्या गुंडांवर रणबीर कपूर कुऱ्हाडीने एकामागे एक सपासप वार करताना दिसतोय. या प्री टीझरमध्ये रणबीरचा पूर्ण चेहरा दाखवलेला नाही. पण त्याची एख झलक पाहून चाहते अक्षरश: वेडे झालेत. आणि ड्रामा अशा मिक्स प्री टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. रणबीरच्या “अ‍ॅनिमल” प्री - टिझर येताच तयार लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.

News18लोकमत
News18लोकमत

भूषण कुमार निर्मित, या क्लासिक गाथेमध्ये भारतीय चित्रपट उद्योगातील दोन डायनॅमिक पॉवरहाऊस आहेत - दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि अभिनेता रणबीर कपूर! हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम या 5 भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत आहेत.

जाहिरात

अ‍ॅनिमल फिल्मची नक्की कथा काय असेल याचा अद्याप काहीही खुलासा करण्यात आलेला नाही.रणबीर कपूरने एका मुलाखतीत ही एक क्राईम ड्रामा असल्याचं सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात