मुंबई, 7 नोव्हेंबर- अनिल कपूर (Anil Kapoor) वयाच्या 64 व्या वर्षी आताच्या पिढीतील बॉलिवूडच्या अभिनेत्यांना फिटनेसमध्ये मागे टाकतात. कपूर घरातील दिवाळी पार्टीमुळे अनिल कपूर चांगलेच चर्चेत आले आहेत. अनिल कपूर यांना आता त्यांच्या दोन लाडक्या लेकींची आठवण सतावत आहे. सोशल मीडियावर (Social Media) जून्या आठवणींना उजाळा देत सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि रिया कपूरचे (Rhea Kapoor) फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी भावनिक कॅप्शन दिली आहे. सोनम कपूर आणि रिया कपूर लग्नानंतर वडिलांपासून वेगळ्या म्हणजे सासरी राहत आहेत. मुली सासरच्या घरी गेल्यावर अनिल कपूर यांना दररोज आपल्या मुलींची आठवण येते. पण आज त्यांना आपण जास्त मिस करत असल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली आहे. त्यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये सोनम कपूर आणि रिया कपूर दिसत आहेत.
पहिला फोटो कोणाच्यातरी वाढदिवसाचा आहे, ज्यामध्ये सोनम आणि रिया एकमेकांना केक खाऊ घालताना दिसत आहेत. दुसऱ्या छायाचित्रातही दोन्ही बहिणी एकत्र दिसत आहेत. तिसर्या फोटोत दोघी नववधूंप्रमाणे सजलेल्या कॅमेरासमोर पोज देताना दिसत आहेत. या फोटोत अनिल कपूरही दिसत आहे. वाचा : साऊथ स्टार Sai Dharam Tej अखेर घरी परतला; 2 महिन्यापूर्वी झाला होता अपघात या फोटोंसोबत त्यांनी एक पोस्ट शेअर केलेली आहे. यामध्ये वडिलांच्या भावना दिसून येत आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की- ‘मला तुमच्या दोघींची दररोज खूप आठवण येते पण आज… सोनम आणि रिया तुमची जरा जास्तच आठवण येत आहे… . सेलेब्सहीत चाहते या पोस्टवर सतत प्रतिक्रिया देत आहेत. वाचा : ‘बिग बॉस’ फेम रुबिना दिलैकच्या बहिणीचा झाला साखरपुडा; सुंदर फॅमिली फोटो VIRAL एका यूजरने लिहिले आहे की - खूप क्यूट. दुसर्याने लिहिले - मुली खूप गोड असतात. दुसर्याने लिहिले- ‘एक वडिलांच्या मुलींच्याविषयीच्याभावना….प्रेम’. सोनम आणि आनंदचे लग्न 2018 मध्ये झाले होते. दोघेही लंडनमध्ये स्थायिक आहेत. तर अनिल कपूर यांची दुसरी मुलगी रिया हिचे लग्न याच वर्षी ऑगस्टमध्ये करणसोबत झाले आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते.