जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'बिग बॉस' फेम रुबिना दिलैकच्या बहिणीचा झाला साखरपुडा; सुंदर फॅमिली फोटो झाले VIRAL

'बिग बॉस' फेम रुबिना दिलैकच्या बहिणीचा झाला साखरपुडा; सुंदर फॅमिली फोटो झाले VIRAL

'बिग बॉस' फेम रुबिना दिलैकच्या बहिणीचा झाला साखरपुडा; सुंदर फॅमिली फोटो झाले VIRAL

रुबिना जेव्हा ‘बिग बॉस 14’ मध्ये होती तेव्हा ज्योतिकानेही काही वेळ शोमध्ये घालवला होता. यावेळी ती सर्वच प्रेक्षकांना आवडली होती. बहिणीप्रमाणेच तिलासुद्धा सर्वांचं प्रेम मिळालं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 नोव्हेंबर- रुबिना दिलैकची  (Rubina Dilaik)  बहीण ज्योतिका दिलैक  (Jyotika Dilaik Engaged)  हिने तिचा लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड रजत शर्मासोबत शुक्रवार, ५ नोव्हेंबर रोजी साखरपुडा केला.  अभिनेत्रीसोबतच चाहत्यांनीसुद्धा  रिंग सेरेमनीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनवने या सोहळ्याची माहिती न देता इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे पोस्ट केली होती, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘काहीतरी खास करण्याची तयारी करत आहे.’

जाहिरात

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रुबिनाची बहीण ज्योतिका आणि तिचा मंगेतर रजत एका कौटुंबिक समारंभात एकमेकांसोबत क्यूट दिसत आहेत. गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात ज्योतिका खूपच सुंदर दिसत आहे, तर रजत पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजामामध्ये अतिशय देखणा दिसत आहे.व्हिडिओमध्ये रजत आणि ज्योतिकाचा क्यूट प्रँक्स स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. हे जोडपे एकत्र खूपच सुंदर दिसत आहे. रुबीनाने व्हिडिओवर कमेंट म्हणून हार्ट इमोजी शेअर केला आहे, तर गायक जान कुमार सानूने लिहिले की, ‘ज्योतिका आणि रजत दोघांचेही अभिनंदन.’

रुबिना जेव्हा ‘बिग बॉस 14’ मध्ये होती तेव्हा ज्योतिकानेही काही वेळ शोमध्ये घालवला होता. यावेळी ती सर्वच प्रेक्षकांना आवडली होती. बहिणीप्रमाणेच तिलासुद्धा सर्वांचं प्रेम मिळालं होतं. या सोहळ्यात ज्योतिका आणि रजत एकमेकांना अंगठी घालताना दिसले. रजतने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ज्योतिकासोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे. याशिवाय ज्योतिकाची आई शकुंतला दिलैक यांनीही हाच फोटो पोस्ट केला आहे. फोटो पाहून असं दिसत आहे,  की हा एक छोटासा कौटुंबिक समारंभ होता, ज्यामध्ये फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. इंटरनेटवर साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये रुबिना आणि अभिनव शुक्ला देखील दिसून आले. रुबिना मेटॅलिक साडीमध्ये सुंदर दिसत आहे, तर अभिनव शुक्ला मऊ गुलाबी कोटसह पांढरा कुर्ता-पायजामाममध्ये हॅंडसम दिसत आहे. ज्योतिका ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. ती एक युट्युबर आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते लोकांना पसंतदेखील पडतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात