जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / वेस्टर्न ड्रेसमध्ये अनन्या पांडेची झाली अशी फजिती; विजय देवेरकोंडाने घेतली मदतीस धाव, पाहा VIDEO

वेस्टर्न ड्रेसमध्ये अनन्या पांडेची झाली अशी फजिती; विजय देवेरकोंडाने घेतली मदतीस धाव, पाहा VIDEO

वेस्टर्न ड्रेसमध्ये अनन्या पांडेची झाली अशी फजिती; विजय देवेरकोंडाने घेतली मदतीस धाव, पाहा VIDEO

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या आपल्या ‘लायगर’ या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 जुलै-   बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या आपल्या ‘लायगर’ या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. हैद्राबाद,दिल्ली, मुंबई अशा अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. परंतु एके ठिकाणी प्रमोशनदरम्यान असं काही घडलं की तो आता चर्चेचा विषय बनला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असं काही घडलं आहे, की लोक पुन्हा-पुन्हा हा व्हिडीओ पाहताना दिसून येत आहेत. वास्तविक सोशल मीडियाच्या एका फॅन पेजवर विजय आणि अनन्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या प्रमोशन दरम्यानचा या व्हिडीओमध्ये अनन्या ब्लॅक ड्रेसमध्ये दिसून येत आहे. अनन्या आणि विजय समोर स्टेजवर बसलेले दिसून येत आहेत. दरम्यान अनन्या आपल्या हाय स्लिट वेस्टर्न गाउनमध्ये थोडीशी अस्वस्थ दिसून येत आहे. तिला खुर्चीवर बसण्यासाठी थोडी अडचण होत असलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान विजयला अनन्याची ही घालमेल लक्षात येते. आणि तो अनन्याची खुर्ची आपल्या हाताने बाजूला ओढतो. त्यामुळे अनन्या थोडी रिलॅक्स होते. हा व्हिडीओ पाहून हे वाचा: सर्वजण विजयचं कौतुक करत आहेत.

जाहिरात

(हे वाचा: Koffee With Karan 7: कोणताही अभिनेता नव्हे तर ‘हा’ मुलगा आहे अनन्या पांडेचा Crush, अभिनेत्रीचं सिक्रेट लिक ) हा व्हिडीओ पाहून नेटकरी सोशल मीडियावर प्रचंड कमेंट्स करत आहेत. यामध्ये काहींना विजयची ही कृती पाहून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आठवण येत आहे. कारण सेम असंच काहीसं सुशांतने क्रिती सेननसाठी केलं होतं. दरम्यान काही लोक अनन्याला तिच्या ड्रेसवरुन ट्रोल करतानाही दिसत आहेत. स्वतः चा ड्रेस स्वतःला सांभाळता येत नसेल तर का परिधान करता? असे प्रश्न कमेंट्समधून तिला विचारले जात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात