'कॉफी विथ करण' करण जोहरचा हा चॅट शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारणसुद्धा असंच आहे. या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय कलाकार हजेरी लावतात.
2/ 8
हे कलाकार फक्त हजेरी लावत नाहीत, तर आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत चकित करणारे खुलासेदेखील करतात.
3/ 8
नुकतंच या 'कॉफी विथ करण 7' च्या चौथ्या एपिसोडमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांनी उपस्थिती लावली होती. सोबतच त्यांनी अनेक खुलासेदेखील केले आहेत.
4/ 8
दरम्यान अनन्या पांडेने एक अशी गोष्ट सांगितली जे ऐकून सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.
5/ 8
यावेळी करण जोहरने स्वतः खुलासा करत सांगितलं की, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अनन्या पांडेचा बालपणापासूनचा क्रश आहे.
6/ 8
यावर करणने अनन्याला विचारलं, बालपणापासून आर्यन तुझा क्रश असतानासुद्धा तुमच्यात लिंकअप का नाही झालं?
7/ 8
यावर उत्तर देत अनन्याने म्हटलं, 'हे तुम्ही त्यालाच जाऊन विचारा'. या सर्व प्रक्रारावर आता सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे.
8/ 8
आर्यन खान, सुहाना खान आई अनन्या पांडे बालपणापासूनचे मित्र आहेत. सुहाना आणि अनन्या पांडे तर बेस्ट फ्रेंड्स आहेत.