जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Amruta Subhash: अमृता-संदेशमध्ये 'या' गोष्टीने झाला मोठा इश्यू, पाहा हा मजेदार video

Amruta Subhash: अमृता-संदेशमध्ये 'या' गोष्टीने झाला मोठा इश्यू, पाहा हा मजेदार video

Amruta Subhash: अमृता-संदेशमध्ये 'या' गोष्टीने झाला मोठा इश्यू, पाहा हा मजेदार video

मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळख असणारी अमृता सुभाष (Amruta Subhash and Sandesh Kulkarni) सध्या तिच्या नवऱ्यासह मिळून ‘पुनःश्च हनिमून’ नाटकात पाहायला मिळत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 8 जुलै: अमृता सुभाष (Amruta Subhash) अभिनेत्री सध्या हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये दोन वेगवेगळ्या कलाकृतींसह झळकताना दिसत आहे. अमृता आणि तिचा नवरा (Amruta Subhash husband) संदेश कुलकर्णी एकत्र येऊन ‘पुनःश्च हनिमून’ हे नवरा बायकोच्या आयुष्यावर आधारित नाटक करताना दिसत आहेत. या नाटकाच्या प्रमोशनसाठी दोघेही भन्नाट शक्कल लढवताना दिसत आहे. सध्या या कपलमध्ये एका गोष्टीने बराच मोठा इश्यू झाल्याचं समोर येत आहे. अमृता आणि संदेश (Sandesh Kulkanri) यांचं पुनःश्च हनिमून हे नाटक (Amruta Subhash new marathi play) पुन्हा रिओपन झालं असून सध्या त्याचे तुफानी प्रयोग अवघ्या महाराष्ट्रात सुरु आहेत. अमृता बऱ्याच दिवसांनी रंगभूमीवर परतली असून सध्या या कपलने नाटकाचं प्रमोशन करायला सोशल मीडियाचा फारच उत्तम वापर केल्याचं पाहायला मिळत आहे. अमृता आणि संदेश नवरा बायकोच्या आयुष्यात रोज होणाऱ्या कुरबुरी, वाद याबद्दल धमाल व्हिडिओ करताना दिसत आहेत. असाच त्यांचा एक नवीन विडिओ समोर येत असून त्यात अमृता संदेशच्या आयुष्यात एका टिशू पेपरमुळे घोळ झाल्याचं दिसून येत आहे.अमृता चुकीचा टिशू पेपर घेऊन येते आणि एकदम चिंतेत आता काय करायचं असं संदेशला विचारते. ‘नात्यात झालेल्या चुका सांभाळून घ्यायच्या असतात’ असं म्हणत संदेश तिच्या या चिंतेचं निरसन करून देऊन त्यावर कमाल उपाय शोधून काढतो असं यात मजेदार पद्धतीने दाखवलं आहे. नवरा बायकोच्या संसारात अनेकदा असे मजेदार प्रसंग येत असतात. त्यातल्याच एका प्रसंगावर आधारित रील दोघांनी शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे. हे ही वाचा-  Aapdi Thaapdi movie: मुक्ता-श्रेयस घेऊन येत आहेत ‘आपडी थापडी’चा अनोखा खेळ, सिनेमाची तारीख आली समोर संदेशची उडालेली धांदल पाहून अनेक चाहत्यांना हसू आवरणं कठीण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मागे सुद्धा या जोडीने असे अनेक भन्नाट व्हिडिओ शेअर केले होता ज्याला चाहत्यांची बरीच पसंती मिळाली होती.

जाहिरात

अमृता सध्या झी 5 वरील ‘सास बहु आचार Pvt. Ltd.’ वेबसिरीजमध्ये झळकताना दिसत आहे. एका सामान्य घरातील स्त्रीने ठरवलं तर ती स्वतःच्या बळावर अख्खा व्यवसाय चालवू शकते असा संदेश देणारी ही वेबसिरीज आहे असं सांगितलं जात आहे. यामध्ये अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने सासू सुनेचं नातं दाखवण्यात आलं आहे अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात