मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Amruta Khanvilkar: चंद्रा आणि दौलतरावांची रियल लाईफ बायको दिसणार 'या' सिनेमात एकत्र

Amruta Khanvilkar: चंद्रा आणि दौलतरावांची रियल लाईफ बायको दिसणार 'या' सिनेमात एकत्र

चंद्रमुखीमध्ये अमृता आणि आदिनाथ यांची उत्तम केमिस्ट्री दिसून आली होती. येत्या काळात अमृता आदिनाथच्या रियल लाईफ बायकोसोबत एका खास सिनेमात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

  मुंबई 18 जुलै: मराठीमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नवे विषय, नवे कलाकार आणि त्यांची बनणारी केमिस्ट्री प्रेक्षकांना भलतीच आवड्ताना दिसत आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडे आता पुन्हा त्यांच्या अप्रतिम अंदाजात एक नवीन लव्हस्टोरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ऑटोग्राफ असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमामध्ये मराठीतील दोन आघाडीच्या नायिका एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने उर्मिला कोठारे आणि अमृता खानविलकर (amruta khanvilkar and urmila kothare together) या दोघी एकत्र दिसून येणार आहेत. तसंच या सिनेमात अंकुश चौधरी सुद्धा पाहायला मिळणार आहे. अंकुश आणि उर्मिला यांनी सतीशसोबत याआधी सुद्धा एक सिनेमा केला आहे. आता त्यांच्या या टीममध्ये अमृता सुद्धा सामील होणार आहे. अमृता आणि उर्मिला या दोघीनींही सिनेमाची घोषणा झाल्यानंतर एक खास व्हिडिओसुद्धा आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सगळ्या टीममेम्बरची नाव आहेत पण दोघीनींही एकमेकांना टीममध्ये टॅग केलं नसल्याचं दिसून येत आहे. दोघींच्याही सोशल मीडियावर फक्त एकमेकींच्या नावाचा छोटासा उल्लेख असल्याचंच दिसून येत आहे. तसंच या दोघी एकमेकींना सोशल मीडियावर फॉलोसुद्धा करत नसल्याचं दिसून येत आहे.
  अमृता सध्या चंद्रमुखी सिनेमामुळे प्रकाशझोतात आली. तिच्या या सिनेमातील परफॉर्मन्सचं प्रचंड कौतुक झालं. या सिनेमाने अमृताला नवी ओळख दिली. यामध्ये उर्मिलाचा नवरा आदिनाथ हा दौलतराव या भूमिकेत दिसून आला होता. उर्मिला सुद्धा वर्क फ्रंटवर तुझेच मी गीत गात आहे मालिकेत दिसून येत आहे. हे ही वाचा- Sonalee Kulkarni: लाडक्या संजय दादाला सोनालीने दिल्या गरमागरम शुभेच्छा, पाहा हा video सतीश राजवाडे दिग्दर्शित ऑटोग्राफ हा सिनेमा एक गोड लव्हस्टोरी दाखवणारा असणार आहे. सतीश आणि अंकुश यांनी ती सध्या काय करते सारखा एक अप्रतिम सिनेमा प्रेक्षकांना दिल्यानंतर या नव्या लव्हस्टोरीमध्ये काय बघायला मिळणार याची उत्सुकता दिसून येत आहे. हा सिनेमा डिसेंबर महिन्यात रिलीज होणार आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Urmila kamitkar

  पुढील बातम्या