मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sonalee Kulkarni: लाडक्या संजय दादाला सोनालीने दिल्या गरमागरम शुभेच्छा, पाहा हा video

Sonalee Kulkarni: लाडक्या संजय दादाला सोनालीने दिल्या गरमागरम शुभेच्छा, पाहा हा video

कॅप्टन ऑफ द शिप समजल्या जाणाऱ्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला सोनालीने एका धमाल अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

कॅप्टन ऑफ द शिप समजल्या जाणाऱ्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला सोनालीने एका धमाल अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

कॅप्टन ऑफ द शिप समजल्या जाणाऱ्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला सोनालीने एका धमाल अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Published by:  Rasika Nanal

मुंबई 18 जुलै: मराठी इंडस्ट्रीत एक अग्रगण्य दिग्दर्शक, छायाचित्रकार म्हणून ओळख असलेल्या संजय जाधव यांचा आज (sanjay jadhav birthday) वाढदिवस आहे. अरे आओ ना फिर या डायलॉगसाठी संजय जाधव बरेच लोकप्रिय आहेत. संजय जाधव यांचा तमाशा live हा सिनेमा नुकतच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या हिरोईनने म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लाडक्या संजय दादाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय जाधव हे दिग्दर्शन आणि छायाचित्रणासोबत अभिनय करतात हे सुद्धा आता अनेकांना माहित आहे. पण तमाशा live च्या निमित्ताने त्यांच्या नृत्याचे स्किल्स सुद्धा चाहत्यांना बघायला मिळत आहेत. (sonalee kulkarni birthday wishes to sanjay jadhav) सोनालीने शेअर केलेल्या खास व्हिडिओमध्ये संजय जाधव बिनधास्तपणे नृत्य करताना दिसत आहेत. सिनेमातील गाणी शूट करताना त्यातले काही bts व्हिडिओ एकत्र करून सोनालीने संजय जाधव नृत्य करताना आणि मोकळेपणाने थिरकताना किती चॅन दिसतात हे दाखवलं आहे.

या व्हिडिओला कॅप्शन देत ती असं लिहिते, “हॅपी बर्थडे संजय सर, तुम्ही कायम अशाच आनंदात, उत्साहात नाचत राहा अशी अपेक्षा. तुमच्यासोबत काम करून तुमच्याकडे असलेलं पॅशन आणि फिल्ममेकिंगचं तंत्र हे जवळून अनुभवता आलं. तुम्ही अशाच स्वतःला आणि जगाला आनंद देणाऱ्या सुंदर कलाकृती बनवत राहा हीच अपेक्षा करते. तुमच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये मला सामील करून घेतल्याबद्दल खूप आभार.”

संजय जाधव यांच्या या धमाल डान्सचं सध्या बरंच कौतुक होत आहे. संजय यांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी याआधी सुद्धा रंग लागला गाण्यावर ताल धरत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं होतं.

हे ही वाचा- Thipkyanchi Rangoli: वीणा जगतापनंतर 'ठिपक्यांची रांगोळी'मध्ये नव्या पात्राची एंट्री! हास्यजत्रेत प्रेक्षकांचं केलंय तुफान मनोरंजन

सोनाली कुलकर्णी सचित पाटील यांच्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात असलेली झुंज दाखवणारा एक म्युजिकल सिनेमा घेऊन संजय जाधव प्रेक्षकांसमोर आले आहेत. या चित्रपटाचं प्रमोशन इतकं जबरदस्त पद्धतीने केलं की सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

First published:

Tags: Marathi entertainment, Sonalee Kulkarni