जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांनी घेतला आपल्या लग्नातील उखाणा; वाचून तुम्हीही म्हणाल क्या बात...

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांनी घेतला आपल्या लग्नातील उखाणा; वाचून तुम्हीही म्हणाल क्या बात...

अमृता फडणवीस

अमृता फडणवीस

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्या आपल्या नव्या ‘आज मैने मूड बना लिया है..’ या गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आल्या आहेत.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 जानेवारी-   महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्या आपल्या नव्या ‘आज मैने मूड बना लिया है..’ या गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आल्या आहेत. हे गाणं सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांनी स्वतः डान्स आणि अभिनय केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अमृता या गाण्याचं प्रमोशन करत होत्या. दरम्यान त्यांनी एका वेबसाईटला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास मराठीमध्ये उखाणा घेत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अमृता फडणवीस या नेहमीच आपल्या धमाकेदार गाण्यांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्या प्रत्येक गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसून येते. सध्या व्हायरल होत असलेल हे गाणं बॅचलर पार्टीच्या कॉन्सेप्टवर आधारित आहे. यामध्ये अमृता फडणवीसांचा ग्लॅमरस लुक चांगलाच चर्चेत आला आहे. लोकप्रिय टी सिरीजच्या या गाण्याचाटीजर 5 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून चाहते या गाण्याची प्रतीक्षा करत होते. तसेच अमृता फडणवीस यांनीही काही दिवसांपूर्वी त्यांच्या नवीन गाण्याचे पोस्टर सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले होते. **(हे वाचा:** Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेशने जिनिलियासाठी घेतला हटके उखाणा; ऐकून तुम्हीही म्हणाल वाह्ह् ) तसेच अमृता फडणवीस यांनी गाण्याच्या प्रमोशनदरम्यान मराठी वेबसाईट पिपिंगमुनला मुलखात दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक उखाणा घेण्यास सांगण्यात आलं होतं. यावेळी अमृता फडणवीसांनी मोठ्या उत्साहाने होकार देत, मी आमच्या लग्नातील उखाणा घेणार असल्याचं सांगितलं. हा उखाणा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी अमृता फडणवीसांनी उखाणा घेत म्हटलं, ‘मी फिरते मळ्यात.. नजर माझी तळ्यात.. देवेंद्रजींसारखे रत्न पडले माझ्या गळ्यात’. असा उखाणा घेत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा उखाणा आपण आपल्या लग्नात घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अमृता फडणवीस सतत मुलाखतींमध्ये आपल्या लग्नाबाबत आणि आपल्या कुटुंबाबत किस्से शेअर करत असतात. हा उखाणा सध्या चांगलाच पसंत केला जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अमृता फडणवीस यांच्या शैक्षणिक क्षेत्राबाबत सांगायचं तर, त्या एक बॅंकर असून त्यांना गायनाची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत बरीच गाणी गायली असून त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात