उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बँकेर तसंच गायिका अमृता फडणवीस यांचं नव्या नर्षात नवं गाणं प्रदर्शित होणार आहे.
‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’ असं त्यांच्या नव्या गाण्याचं नाव आहे. गाण्याबरोबरचं यावेळी अमृता फडणवसींच्या लुकची आणि ज्वेलरीची चर्चा आहे.
जीन्स, व्हाइट टॉप विथ पंजाबी स्टाइल जॅकेटवर अमृता यांनी ऑक्सडाइज ज्वेलरी कॅरी केली आहे. त्यांच्या लुकची सर्वत्र चर्चा आहे. पण हाच लुक नाही तर याआधीही अमृता फडणवीसांनी केलेल्या गाण्यांमधील त्यांचे लुक्स लक्षात पाहण्यासारखे आहेत.
बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेल्या 'फिर से' या गाण्यात अमृता फडणवीस एखाद्या कॉलेज तरूणीसारख्या दिसल्या.
'वो तेरे प्यार का गम' या गाण्यात अमृता फडणवीसांनी चोकर आणि ब्लॅक कलरच्या वन पिससह ग्लॅमरस लुक कॅरी केला होता.
आतापर्यंतच्या अमृता यांच्या शिव तांडवमधील लुकची सर्वाधिक चर्चा झाली होती. कुरळे केस आणि भगव्या ड्रेसमधील अमृता फडणवीसांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
कोरोनाच्या काळात आलेल्या गणेश वंदनेत अमृता महाराष्ट्रीय घराघरात असलेल्या अस्सल मराठमोळ्या पेहेरावात दिसल्या.