नवी दिल्ली, 31 जानेवारी: एक अभिनेत्री, मॉडेल, टेलिव्हिजन प्रेझेंटर आणि व्हीजे अशी ओळख अमृता अरोरानं मिळवली आहे. अभिनेत्री अमृता अरोरा (Amrita Arora) आज (31 जानेवारी) आपला 41वा वाढदिवस साजरा करत आहे. 31 जानेवारी 1981 रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये तिचा जन्म झाला. तिचे वडील अनिल अरोरा (Anil Arora) हे पंजाबी तर आणि आई जॉयसी पॉलीकार्प (Joyce Polycarp) या मल्याळी आहेत. अमृताचा वाढदिवस खास करण्यासाठी, तिची बहीण मलायका अरोरा (Malaika Arora) व तिच्या जवळच्या मैत्रिणी करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांनी सोशल मीडियावर कौतुकाच्या पोस्ट लिहिल्या आहेत.
मलायकानं केक कट करत असलेला अमृताचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत बर्थ डे कॅप घातलेल्या करिना कपूर आणि करिश्मा कपूर उभ्या आहेत. त्यांची जवळची मैत्रीण मल्लिका भट हिनंही त्यांच्यासोबत खास पोज दिली आहे. या फोटोसोबत मलायकानं एक कॅप्शनदेखील दिलं आहे. 'द ग्लु टू अवर गँग.....हॅपी बर्थडे माय बेबी सिस्टर @amuaroraofficial .... लव्ह यू, अशी कॅप्शन मलायकानं दिली आहे. या पोस्टमध्ये तिनं करिना, करिश्मा आणि मल्लिकाला टॅगदेखील केलं आहे.
View this post on Instagram
करिनाने त्याच इव्हेंटमधील एक वेगळा फोटो शेअर करून आपली बेस्ट फ्रेंड असलेल्या अमृताला शुभेच्छा दिल्या आहेत. 'माझ्या BFFला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्यासारखं कोणीही नाही. आम्ही अशा आहोत.' असं कॅप्शन करीनानं दिलं आहे. आणखी एका इंन्स्टाग्राम पोस्टमध्ये (Instagram Post) करीनानं दुसरा ग्रुप फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला 'माय अमू' कॅप्शन देऊन हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. करिनानं अमृतासोबतच्या चॅटचा एक स्क्रीनशॉटदेखील पोस्ट केला आहे. करिश्मा कपूरनंदेखील अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'हॅपी बर्थ डे टू माय डार्लिंग अमोलास' अशी कॅप्शनदेऊन करिश्मानं शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृतानं आतापर्यंत जवळपास 20 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं 2002 मध्ये फरदीन खानसोबत (Fardeen Khan) ‘कितने दूर कितने पास’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर अमृतानं अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल याच्यासोबत ‘आवारा पागल दीवाना’, संजय दत्त, गोविंदा आणि जॅकी श्रॉफसोबत ‘एक और एक ग्यारह’, तुषार कपूर, अनुपम खेर आणि राजपाल यादव यांच्या सोबत ‘शार्ट: द चॅलेंज’, ईशा कोप्पिकर आणि आशीष चौधरीसोबत ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
याशिवाय तिनं बिपाशा बासू, संजय दत्त, दिनो मोरिया, सुनील शेट्टी आणि नेहा धुपियासोबत ‘रख्त’, अक्षय कुमार, करीना कपूर आणि किरण खेरसोबत ‘कमबख्त इश्क’ यासारख्या चित्रपटांमध्येही चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 'एक तो चान्स' हा तिचा तिचा शेवटचा चित्रपट होता. त्यात तिनं पूरब कोहली, अली फजल, पवन मल्होत्रा आणि विजय राज यांच्यासोबत काम केलं होतं.
अमृतानं 2009 मध्ये बिझनेसमन शकील लडाकशी (Shakeel Ladak) लग्न केलं. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. अमृता सध्या चित्रपटांपासून दूर असून ती आपल्या कुटुंबाला वेळ देत आहे. अमृता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. बहुतेक वेळा ती आपल्या गर्ल गँगसोबत मस्ती करताना दिसते. अमृताला आपला वाढदिवस मित्रमैत्रीणींसोबत साजरा करण्याची सवय आहे. करीना, करिश्मा, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, सैफ अली खान, नताशा पूनावाला, महीप कपूर, रितेश सिधवानी हे तिचे जवळचे मित्र आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Birthday celebration, Bollywood, Entertainment, Fardeen Khan, Kareena Kapoor, Malaika arora