मुंबई, 22 जून : मनोरंजन क्षेत्रातील ट्रेंड सातत्यानं बदलत आहेत. आता डिजिटलच्या जमान्यात तर सिनेमातील डायलॉग गाणी काही क्षणात व्हायरल होऊन प्रेक्षकांच्या डोक्यात फिट होतात. पण बॉलिवूडमधील असे काही अभिनेते ज्यांचे डायलॉग हिट होण्यासाठी सोशल मीडियाची गरज भासली नाही. त्यांच्या अभिनयानं आणि डायलॉग फेकण्याच्या टायमिंगनं सर्वांची मनं जिंकली. असाच एक अभिनेता म्हणजे अमरीश पुरी. आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकलीच पण त्यांचे डायलॉग अजरामर झाले. त्याचप्रमाणे त्यांचा दमदार आवाज आजही भल्याभल्यांच्या अंगावर काटा आणतो. आज अभिनेते अमरीश पुरी यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्तानं त्यांचे 10 दमदार फेमस डायलॉग कोणते आहेत पाहूयात. अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून 1932साली पंजाबमध्ये झाला. 1967 ते 2005 या काळात त्यांनी जवळपास 450 हून अधिक सिनेमात काम केलं. अमरीश पुरी हे विनलच्या भुमिकेसाठी प्रामुख्याने ओळखले गेले. निगेटीव्ह भुमिकांमुळे त्यांना ओळख मिळाली. अमरीश पुरी यांची डायलॉग डिलिव्हरी इतकी जबरदस्त होती की त्यांच्या साध्या आवाजाने अंगावर काटे उभे राहत. त्यांची हिच खुबी त्यांची ओळख होती. अमरीश पुरी यांनी हिंदी सिनेमांबरोबर पंजाबी, तमिळ, कन्नड, मल्याळम सिनेमातही काम केलं आहे. हेही वाचा - रामायणच नाही दूरदर्शनवरील ‘या’ मालिकाही होत्या प्रसिद्ध; संपूर्ण कुटुंब एकत्र आवडीनं पाहायचं अमरीश पुरी यांचे फेमस डायलॉग
- मोगैंबो खुश हुआ हा 1987 साली आलेल्या मिस्टर इंडिया सिनेमातील डायलॉग
- ये अदालत है, कोई मंदिर या दरगाह नहीं जहां मन्नतें और मुरादें पूरी होती हैं, यहां धूप बत्ती और नारियल नहीं बल्कि ठोस सबूत और गवाह पेश किए जाते हैं, हा 1993मध्ये आलेल्या दामिनी सिनेमातील डायलॉग आहे.
- थप्पड़ तुम्हारे मुंह पर पड़ा है और निशान मेरे गाल पर पड़े हैं. 1992मध्ये आलेल्या विश्वात्मा सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग.
- गलती एक बार होती है, दो बार होती है, तीसरी बार इरादा होता है. 1989मध्ये आलेल्या इलाका सिनेमातील हा डायलॉग आजही फेमस आहे.
- 1992मध्ये आलेल्या दीवाना सिनेमातील ये दौलत भी क्या चीज़ है, जिसके पास जितनी भी आती है, कम ही लगती है हा डायलॉग.
- पैसों के मामले में मैं पैदाइशी कमीना हूं, दोस्ती और दुश्मनी का क्या, अपनों का खून भी पानी की तरह बहा देता हूं. शाहरूख सलमान खान यांच्या करन अर्जुन सिनेमातील डायलॉह. 1995 हा सिनेमा रिलीज झाला होता.
- नए जूतों की तरह शुरू में नए अफसर भी काटते हैं. हा डायलॉह 1990 मध्ये आलेल्या मुकद्दर का बादशाह सिनेमातील आहे.
- जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी! हा आयकॉनिक डायलॉग 1995 मधील दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सिनेमातील आहे.

)







