Home /News /entertainment /

बच्चन कुटुंबाच्या घरापर्यंत कसा पोहोचला कोरोना? आता असा होणार तपास

बच्चन कुटुंबाच्या घरापर्यंत कसा पोहोचला कोरोना? आता असा होणार तपास

बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या स्टाफची पुन्हा टेस्ट होणार आहे.

    मुंबई, 14 जुलै : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी कोरोनाव्हायसबाबत आपल्या सोशल मीडियावरून सातत्याने जनजागृती केली. शिवाय लॉकडाऊनमध्येही बच्चन कुटुंब घरातच होतं. तरीदेखील बच्चन कुटुंबाच्या घरापर्यंत कोरोना पोहोचला कसा, याबाबत आता तपास सुरू झाला आहे. बच्चन कुटुंबाच्या स्टाफची कोरोना टेस्ट करण्यात आली मात्र ती नेगेटिव्ह आली. आता त्यांची पुन्हा अँटिबॉडी टेस्ट केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेतर्फे बच्चन कुटुंबातील 26 स्टाफ मेंबर्सची कोरोना टेस्ट करण्यात आली. टेस्टमध्ये सर्व कर्मचारी कोरोना नेगेटिव्ह आहेत. आता त्यांची दुसऱ्यांदा टेस्ट केली जाणार आहे. या सर्वांची आता अँटिबॉडी टेस्ट होणार आहे. जेणेकरून त्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती की नाही हे समजेल. काय आहे अँटिबॉडीज टेस्ट? कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर शरीरात व्हायरसविरोधात काही दिवसांनी अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज काही दिवस कायम राहतात. या टेस्टमध्ये रक्तचाचणी केली जाते आणि रक्तात या अँटिबॉडीज तयार झाल्यात की नाही हे तपासलं जातं. जर अँटिबॉडीज असतील तर त्या व्यक्तीला आधी कोरोनाची लागण झालेली असल्याचं निदान होतं. हे वाचा - अमिताभ आणि रेखांनंतर झोया अख्तरचाही बंगला केला सील; BMC ने लावला पोस्टर त्यामुळे बच्चन कुटुंबाच्या स्टाफची अँटिबॉडी टेस्ट होणार आहे. तसंच तसंच अमिताभ आणि अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांमध्ये कुठेकुठे गेले होते, त्या ठिकाणीदेखील तपासणी केली जाणार आहे. गेले काही दिवस अमिताभ आणि अभिषेक डबिंगसाठी बाहेर पडले होते. अमिताभ यांच्यासह बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोना 11 जुलैला रात्रीच बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. यानंतर 12 जुलैला ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. हे वाचा - महानायकासाठी महामृत्युंजय यज्ञ; कोरोनामुक्त होईपर्यंत चाहता यज्ञात आहुती देणार अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली. अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ऐश्वर्या आणि आराध्याला होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. बच्चन कुटुंबासाठी चाहत्यांची प्रार्थना बच्चन कुटुंब लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. काही चाहत्यांनी त्यांच्यासाठी विशेष पूजा, महायज्ञही केला आहे. रुग्णालयातूनही अमिताभ सोशल मीडियावरू आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. आपल्या आरोग्याबाबत माहिती देत आहे. हे वाचा - शीश झुकाके नत मस्तक हूँ मैं! Corona शी लढणारे अमिताभ बच्चन झाले भावुक लोकांची आपल्यासाठी ही प्रार्थना आणि प्रेम पाहून अमिताभ भावुक झालेत. अमिताभ यांनी कवितेच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानलेत. मी तुमच्यासमोर हात जोडून आणि नतमस्तक होऊन तुमचे आभार मानतो असं अमिताभ म्हणालेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Abhishek Bachchan

    पुढील बातम्या