मुंबई, 14 जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची प्रकरणे सतत वाढत आहेत. बॉलिवूडमधील सेलिब्रिटीसुद्धा कोरोनाची लागण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे त्यामुळे त्यांचा बंगला बीएमसीने सॅनिटाईझ केला होता, तर अभिनेत्री रेखाच्या गार्डलाही कोरोना व्हायरस झाला होता. बीएमसीने संक्रमणाची माहिती मिळताच अभिनेत्रीचे घर सील केले. आता बातमी आहे की बॉलिवूड दिग्दर्शक जोय आख्तर यांचा बंगला पालिकेने सील केला आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक झोया अख्तर यांचा बंगला रेखाच्या बंगल्याच्या शेजारीच आहे. दोन्ही बंगले जवळजवळ असल्याने महापालिकेने दक्षतेसाठी कारवाई केली आहे. अद्याप झोया अख्तर किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
हे वाचा-कोरोनाच्या संकटात मुंबईतील डबेवाल्याबाबत पालकमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
रेखाच्या अगोदर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी स्टाफला कोरोना असल्याच्या बातम्या आल्या आहेत. यानंतर कलाकारांनादेखील क्वारंटाईन व्हावे लागले आहे. अलीकडेच स्वत: आमीर खानने आपल्या कर्मचार्यांना कोरोना असल्याचे सांगितले होते.
त्याने सांगितले होते की माझे कुटुंब, घरामधील बाकीचे कर्मचारी आणि माझीही कोरोनाची चाचणी घेण्यात आली, जी नकारात्मक झाली आहे. परंतु आम्ही अजूनही खबरदारी घेत आहोत. मला आणि माझ्या कुटुंबीयांकडून बीएमसीचे आभार, ज्याने आम्हाला मदत केली आणि आम्हाला मार्ग दाखविला. सर्व सुरक्षित रहा '
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rekha, Zoya akhtar