मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

जया बच्चन यांचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन; पहिल्यांदाच करणार मराठी चित्रपटात काम

जया बच्चन यांचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन; पहिल्यांदाच करणार मराठी चित्रपटात काम

जया बच्चन यांचे पुनरागमनाचे संकेत; हिंदी ऐवजी मराठी चित्रपटात करणार काम

जया बच्चन यांचे पुनरागमनाचे संकेत; हिंदी ऐवजी मराठी चित्रपटात करणार काम

जया बच्चन यांचे पुनरागमनाचे संकेत; हिंदी ऐवजी मराठी चित्रपटात करणार काम

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई, 17 फेब्रुवारी: जया बच्चन (Jaya Bachchan) या बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. 1973 साली त्यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी लग्न केलं. तेव्हापासून काही मोजके चित्रपट वगळता त्या सिनेसृष्टीत फारशा झळकल्या नाहीत. 2013 साली ‘सनग्लासेस’ या चित्रपटात त्या शेवटच्या झळकल्या होत्या. अन् आता तब्बल सात वर्षानंतर त्या सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे जया बच्चन या कुठल्याही हिंदी नव्हे तर चक्क मराठी चित्रपटामध्ये (Marathi film) काम करणार आहेत. अवश्य पाहा - ‘लशींचा अतिरिक्त साठा भारतीयांसाठी का नाही?’ अभिनेत्रीचा उद्धव ठाकरेंना सवाल शी द पीपल या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन  गजेंद्र अहिरे करणार आहेत. त्यांनी आजवर अनुमती, पोस्टकार्ड, अनवट, बायोस्कोप यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित केलेलं नाही. सध्या या चित्रपटाच्या पटकथा आणि कास्टिंगवर काम सुरु आहे. परंतु हा मराठीतील एक बिग बजेट चित्रपट असेल अशी चर्चा आहे. शिवाय या चित्रपटात जया बच्चन एक महत्वाची भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटाच्या माध्यमातून त्या मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत.
First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment, Star celebraties

पुढील बातम्या