मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दिवाळीत हात भाजल्यानंतरही खिशात हात ठेऊन बिग बीनी केलं होतं शूटिंग; लोकांना वाटलं 'नवी स्टाईल'

दिवाळीत हात भाजल्यानंतरही खिशात हात ठेऊन बिग बीनी केलं होतं शूटिंग; लोकांना वाटलं 'नवी स्टाईल'

बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) हे मोठ्या उत्साहात दिवाळीचा ( Diwali) सण साजरा करतात. ते त्यांचा बंगला जलसा ( Jalsa) येथे पार्टीचे आयोजनही करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना अशा घडतात, की त्या आयुष्यभर विसरता येत नाहीत. अमिताभ बच्चन यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 5 नोव्हेंबर- बॉलिवूडचे  (Bollywood)  महानायक अमिताभ बच्चन  (Amitabh bachchan)  हे मोठ्या उत्साहात दिवाळीचा ( Diwali)  सण साजरा करतात. ते त्यांचा बंगला जलसा ( Jalsa) येथे पार्टीचे आयोजनही करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना अशा घडतात, की त्या आयुष्यभर विसरता येत नाहीत. अमिताभ बच्चन यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. प्रत्येक दिवाळीला अमिताभ यांना काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताची आठवण येते. 1984 मध्ये अमिताभ यांचा 'इन्कलाब' ( Inquilab) हा चित्रपट आला होता. या चित्रपटातून ते अँग्री यंग मॅन  ( Angry Young Man)  म्हणून प्रसिद्ध झाले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फटाक्यामुळे अमिताभ यांचा हात भाजला होता. त्यानंतर चित्रपटाचं उर्वरित शूटिंग करताना स्वतःच्या हाताला झालेली जखम हा अडथळा ठरू नये, यासाठी बच्चन यांनी असं काही केलं, ज्यामुळे प्रेक्षकांना ती बच्चन यांची स्टाइल वाटली. बच्चन यांनी जखम झालेला हात खिशामध्ये ठेवून पुढील शूटिंग पूर्ण केलं होतं.

  बिग बी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते जुन्या चित्रपटांच्या शूटिंगचे फोटो आणि पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांशी आठवणी शेअर करत असतात. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर त्यांच्या आयुष्यातल्या काही घटनाही शेअर केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी दिवाळीला घडलेली दुर्घटना अमिताभ कधीही विसरू शकत नाहीत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याचा उल्लेख केला आहे. बच्चन यांनी लिहिलंय, 'काम चालूच राहिलं. स्टाइल दिसावी म्हणून हातावर रुमाल बांधला होता.. आणि खिशात हात टाकून शूटिंग केलं होतं. काम चालूच राहिलं व ते चालूच राहणं गरजेचं आहे.' स्वतःच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे शूटिंगमध्ये अडथळा येऊ नये, असं अमिताभ बच्चन यांना वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी या नवीन स्टाइलची युक्ती काढली होती.

  (हे वाचा:'आई म्हणत दिवाळीला चमकदार कपडे घाल'; जान्हवी कपूरला आली आई श्रीदेवीची आठवण

  'इन्कलाब' या चित्रपटाशिवाय अमिताभ बच्चन यांनी 'शराबी' चित्रपटाचे शूटिंगही अशाच पद्धतीने पूर्ण केलं. 'इन्कलाब'मध्ये ते हातावर रुमाल बांधून नाचताना दिसतात, तर 'शराबी'मध्ये ते पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत असून त्यांच्या एका हातात ग्लास तर दुसरा हात खिशात दिसतो. बच्चन यांनी दुखापत झालेला हात खिशामध्ये ठेवला होता.अमिताभ बच्चन यांच्या 'इन्कलाब' आणि 'शराबी' या दोन्ही चित्रपटांनी यशाची शिखरं गाठून इतिहास रचला आहे. हात भाजल्याच्या घटनेबाबत अमिताभ यांनी हाताच्या बोटांचं छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केलं होतं. दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजल्याचं सांगतानाच, या जखमेमुळे अंगठा तर्जनीपर्यंत पोहोचायला दोन महिन्यांचा कालावधी लागल्याचं त्यांनी लिहिलं होतं.

  First published:
  top videos

   Tags: Amitabh Bachchan, Diwali, Entertainment