मुंबई,5 नोव्हेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूरला (Janhavi Kapoor) यंदाच्या दिवाळीकडून (Diwali 2021) खूप अपेक्षा आहेत. बर्याच दिवसांनंतर, यंदाच्या दिवाळीत काहीतरी चांगलं घडेल या आशेवर असलेली ही अभिनेत्री तिची आई श्रीदेवीला मिस करतेय. सर्वसामान्य असो की खास, प्रत्येक सणाला मुलांना आई-वडिलांची आठवण येतेच. आई-वडील या जगात नसताना हे दु:ख अधिकच खोल होत जातं. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवीही तिची आई श्रीदेवीसोबत (Shridevi) घालवलेले क्षण आठवत आहे. श्रीदेवीसोबतचा दिवाळीचा सण नेहमीच हास्य, आनंद आणि तेजस्वी रंगांनी भरलेला असायचा.मात्र, बऱ्याच काळानंतर या दिवाळीत अभिनेत्रीला काहीतरी चांगलं अपेक्षित आहे. पण या मोठ्या उत्सवासाठी ती स्वत:ला तयार करू शकत नाही.
जान्हवी कपूर तिची आई श्रीदेवीसोबत दिव्यांचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत असे. गेल्या काही वर्षांत दिवाळीची ही धामधूम थोडी कमी झाली असली, तरी अभिनेत्रीसाठी दिवाळी हा नेहमीच आनंदाचा सण राहिला आहे. जान्हवीने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘तिची आई नेहमी म्हणायची की तिने नवीन वर्ष, वाढदिवस आणि दिवाळीला चमकदार कपडे घालावेत’. अभिनेत्रींसाठी हा दिव्यांचा सण कुटुंबासोबत वेळ घालवण्यापासून ते चांगलं खाण्यापिण्यापर्यंत अशा सर्व गोष्टींनी भरलेला आहे.पार्टीशिवाय फॅमिली गेट टुगेदर करण्यासारख्या अनेक आठवणी या सणाशी संबंधित आहेत. टाइम्सशी संवाद साधताना अभिनेत्रीने तिच्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून दिली आणि सांगितलं की, ‘आम्ही लहान होतो तेव्हा चेन्नईत माझ्या आईच्या घरी जायचो आणि रस्त्यावरील लागलेल्या विद्युतरोषणाई बघायला जायचो. यानंतर सर्वजण एकत्र जमून दक्षिण भारतीय पदार्थांवर ताव मारत असो. आणि आंब्याचा रस पित असो. तेव्हापासून मी आंब्याचा रस दिवाळीशी जोडला आहे. (हे वाचा: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आलिया-रणबीरनं घेतलं काली मातेचं दर्शन! ट्रॅडिशनल LOOK ) यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनच्या प्लॅन्सबद्दल सांगताना, जान्हवी कपूर म्हणाली की, ‘यंदा नक्कीच जास्त अपेक्षा आहेत पण मी स्वतः काही मोठ्या सेलिब्रेशनसाठी तयार आहे, त्याबद्दल माहिती नाही. कोरोना महामारीच्या काळात बरेच नुकसान झाल आहे. प्रत्येकासाठी हा खूप कठीण काळ आहे, बरेच लोक त्यातून सावरण्यासाठी देखील सक्षम नाहीत. माझा या दिवसाच्या पावित्र्यावर विश्वास आहे. आगामी काळातही असेच सकारात्मक वातावरण राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.