जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बिग बी Amitabh Bachchan यांचा नवा प्रोजेक्ट, खास लुक शेअर चाहत्यांना दिली माहिती

बिग बी Amitabh Bachchan यांचा नवा प्रोजेक्ट, खास लुक शेअर चाहत्यांना दिली माहिती

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan

बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. सतत काही ना काही शेअर चाहत्यांना स्वतःबद्दल नवी अपडेट्स देत असतात. आताही त्यांनी नवा लुक शेअर आपल्या चाहत्यांना नव्या प्रोजेक्टबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 मार्च: बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. सतत काही ना काही शेअर चाहत्यांना स्वतःबद्दल नवी अपडेट्स देत असतात. आताही त्यांनी नवा लुक शेअर आपल्या चाहत्यांना नव्या प्रोजेक्टबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकतांच आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते प्रायव्हेट जेटमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये बिग बींच्या केसांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. त्यांनी पहिल्यांदाच आपले केस हायलाईट्स केले असल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चन यांनी गुलाबी रंगानी डोक्याच्या पुढच्या केसांचा भाग हायलाईट केला आहे.

जाहिरात

इतकेच नव्हे तर त्यांनी हा नवा लुक शेअर करत खास कॅप्शनदेखील दिली आहे. त्यामध्ये त्यांनी प्रवास आणि गुलाबी रंग. नवीन दिवस, नवीन चित्रपट. असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. याबद्दल बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये नव्या प्रोजेक्टसंदर्भात अधिक माहिती दिली आहे. ते त्यांच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. तसेच, त्यांना नवीन चित्रपटासाठी त्याचा लूक कसा आहे हे शेअर करायचे. परंतु नेटकरी ट्रोल करतील या भीतीने नवा लुक शेअर करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. केसाच्या हायलाईट्सबद्दल म्हणाले, खरतंर या केसांचा कलर लाल होता आणि धुतल्यानंतर त्याचा रंग गुलाबी झाला आहे. तसेच नव्या प्रोजेक्टसंदर्भात माहिती दिली. याशिवाय बिग बींनी आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते डान्स करताना दिसत आहेत. बिग बींसोबत अनुपम खेर, डॅनी डेन्झोंगपा आणि बोमन इराणी दिसत आहेत. सर्वजण सूट घातलेले आणि डोक्यावर टोप्या घातलेले दिसतात. हा फोटो शेअर करत बिग बींनी अजूनही डान्स करण्याचा प्रयत्न करत आहोत. असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

बिग बींचे अनेक चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत ज्यात झुंड, रनवे 34 आणि गुडबाय यांचा समावेश आहे. झुंडचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटात बिग बी फुटबॉल टीम बनवतात. रनवे 34 चा ट्रेलर लवकरच येत आहे ज्यात अजय देवगण, रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. अजयने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात