मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sooryavansham: टीव्हीवर सारखा 'सूर्यवंशम' पाहून वैतागलेल्या प्रेक्षकाने थेट उचललं असं पाऊल; सगळीकडे होतेय चर्चा

Sooryavansham: टीव्हीवर सारखा 'सूर्यवंशम' पाहून वैतागलेल्या प्रेक्षकाने थेट उचललं असं पाऊल; सगळीकडे होतेय चर्चा

सूर्यवंशम

सूर्यवंशम

'सूर्यवंशम' हा चित्रपट अनेकदा सोनी सेट मॅक्स चॅनलवर दाखवण्यात येतो ही बाब काही नवीन नाही. या गोष्टीवर आजवर अनेक मिम्स आणि जोक्स व्हायरल झाले आहेत. पण आता एका प्रेक्षकाने असं काही केलंय कि त्याची सगळीकडेच चर्चा होतेय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 जानेवारी:  भारतीय सिनेसृष्टीत काही चित्रपट असे आहेत जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात, ते वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. याच यादीत अग्रस्थानी येईल तो बिग बींचा 'सूर्यवंशम' हा सिनेमा. अमिताभ बच्चन, साऊथ अभिनेत्री सौंदर्या, अनुपम खेर आणि दिवंगत अभिनेते कादर खान अशा एक सो एक कलाकारांच्या भूमिका असलेला हा चित्रपट त्या काळात चांगलाच गाजला. या चित्रपटात अमिताभ यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. त्यांची भानु प्रतापची भूमिका प्रेक्षकांना आवडली. हा चित्रपट रिलीज होऊन आज तब्बल 24 वर्षे उलटली आहेत. पण हा चित्रपट अनेकदा सोनी सेट मॅक्स चॅनलवर दाखवण्यात येतो ही बाब काही नवीन नाही. या गोष्टीवर आजवर अनेक मिम्स आणि जोक्स व्हायरल झाले आहेत. पण आता एका प्रेक्षकाने असं काही केलंय कि त्याची सगळीकडेच चर्चा होतेय.

'सूर्यवंशम' हा चित्रपट सोनी सेट मॅक्स चॅनलवर दर आठवड्यात एकदा तरी दाखवलाच जातो. हा सिनेमा इतक्या वेळा दाखवण्यात आला आहे की चाहता याला जाम कंटाळला आणि त्याने चक्क थेट चॅनलला पत्र लिहिले आहे. त्याने लिहिलेलं हे पात्र सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.  त्या व्यक्तीने चॅनलला थेट विचारले आहे की,  भविष्यात ते चॅनलवर हा चित्रपट किती वेळा दाखवणार आहेत? डि.के पांडे असं या व्यक्तीचं नाव असून त्याने लिहिलेल्या पात्राची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

हेही वाचा - Ved Movie: 'वेड' चित्रपटात होणार 'हा' बदल; लाईव्ह येत रितेश देशमुखचा मोठा खुलासा

डि.के पांडे यांनी चॅनलला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय कि, "सोनी सेट मॅक्स चॅनलने सूर्यवंशम चित्रपटाचा ठेका घेतला आहे. तुमच्या कृपेने आम्ही आणि आमचे कुटुंब हिरा ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे ओळखत आहोत. तुमच्या चॅनलने हा चित्रपट किती वेळा प्रसारित केला आहे? भविष्यात हा चित्रपट आणखी किती वेळा प्रसारित होणार? त्याचा आमच्या मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला तर त्याला जबाबदार कोण? कृपया कळवण्याची कृपा करावी...'

टीव्ही चॅनलच्या नावाने लिहिलेले हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. हे पत्र वाचल्यानंतर नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले - ही प्रत्येक भारतीयाची गोष्ट आहे जो सोनी सेट मॅक्स पाहतो. आणखी एका युजरने लिहिले की, 'या चित्रपटात बापूजींना दिलेली खीर मी प्यायली असती तर हे दिवस बघावे लागले नसते.' इतकेच नव्हेतर या चित्रपटातील काही सीन्सला घेऊन भन्नाट मिमस तयार झाले आहेत.

आता या प्रेक्षकाची विनंती मान्य करून चॅनल हा चित्रपट दाखवणं बंद करणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Bollywood News, Entertainment