जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अच्छे दिन थे यार...' अमिताभ बच्चन यांची 'ती' पोस्ट चर्चेत; चाहत्यांनी जोडला थेट मोदींशी संबंध

'अच्छे दिन थे यार...' अमिताभ बच्चन यांची 'ती' पोस्ट चर्चेत; चाहत्यांनी जोडला थेट मोदींशी संबंध

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काय आहे या पोस्टमध्ये जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 जुलै : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतात. त्यांच्याविषयी रोज अधिकाधिक जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. बिग बी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय असतात. ते अनेकदा आपल्या पोस्टने चाहत्यांचं  लक्ष वेधून घेतात. अलीकडेच, त्यांनी  त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काय आहे या पोस्टमध्ये जाणून घ्या. शतकातील सुपरस्टार  म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन वयाच्या 80 व्या वर्षीही केवळ मनोरंजन विश्वातच सक्रिय नसून ते सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय राहतात. ते  त्यांच्या चाहत्यांसोबत कायम जोडलेले असतात. आता त्यांची लेटेस्ट पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांचे दोन फोटो शेअर केले आहेत. दोन्ही फोटोंमध्ये बिग बी एकदम बिनधास्त अंदाजात दिसत आहेत. दोघांमध्ये अमिताभचा लूक जवळपास सारखाच आहे. एकामध्ये त्यांनी पांढरा शर्ट, ब्लॅक लेदर जॅकेट, चष्मा आणि डेनिम जीन्ससह बूट घालून ग्राउंडमध्ये साइड पोज दिली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दुसऱ्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांनी काळी जीन्स, ब्राऊन बूट, हिरवे जॅकेट आणि चष्मा घातलेला असून स्टायलिश पोज देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना बिग बींनी कॅप्शनमध्ये “अच्छे दिन थे यार!” असं लिहिलं आहे. ‘फक्त प्रमोशनसाठी लग्न करता तेव्हा…’ कंगनाने बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडप्यावर साधला निशाणा अमिताभ बच्चन यांची पोस्ट आहे आणि चाहते काही प्रतिक्रिया देणार नाही असं होऊच शकत नाही. बिग बींचे हे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. मात्र, या पोस्टच्या कॅप्शनवरून काही जण अमिताभ हे अप्रत्यक्षपणे सरकारला टोमणे मारत आहेत, असं देखील म्हणत आहेत. काही नेटकऱ्यानी अमिताभ यांच्या कॅप्शनचा संबंध मोदींच्या ‘अच्छे दिन आने वाले है’ या घोषणेशी जुळवला आहे.

जाहिरात

अमिताभ बच्चन यांनी अभिनयासोबतच राजकीय कारकिर्दीतही हात आजमावला आहे. तीन वर्षांपासून ते काँग्रेसकडून लोकसभेचे सदस्य म्हणून उभे राहिले होते. तर त्यांच्या पत्नी जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या राज्यसभेच्या खासदार आहेत. एवढंच नाही तर आता त्यांचा मुलगा देखील राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या वर्षी बिग बी ‘ब्रह्मास्त्र’, ‘उंचाई’ आणि ‘गुडबाय’ या तीन बॅक टू बॅक चित्रपटांमध्ये दिसले होते. लवकरच ते ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘गणपत - पार्ट वन’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. बिग बींचा ‘प्रोजेक्ट के’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात तो दीपिका पदुकोण, दिशा पटानी आणि प्रभाससोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी १२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात