जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'या' क्रिकेटपटूच्या सांगण्यावरून, अमिताभ बच्चन यांनी भारत-पाक सामन्यासाठी गायलं होतं राष्ट्रगीत

'या' क्रिकेटपटूच्या सांगण्यावरून, अमिताभ बच्चन यांनी भारत-पाक सामन्यासाठी गायलं होतं राष्ट्रगीत

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

‘कौन बनेगा करोडपती’ शो अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. या कार्यक्रमाची धुरा महानायक अमिताभ बच्चन सांभाळताना दिसतात. केबीसीच्या मंचावर बिग बींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 ऑक्टोबर : ‘कौन बनेगा करोडपती’ शो अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. या कार्यक्रमाची धुरा महानायक अमिताभ बच्चन सांभाळताना दिसतात. केबीसीच्या मंचावर बिग बींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. अलीकडेच बिग बींनी खुलासा केला की, त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राष्ट्रगीत गायले होते. याविषयीचा किस्साही त्यांनी प्रेक्षकांसोबत शेअर केला. KBC 14 च्या शेवटच्या एपिसोडमध्ये बिग बी हॉट सीटवर बसलेल्या साहिल सिंगलासोबत खूप बोलले. यादरम्यान स्पर्धकाने सांगितले की, KBC च्या मंचावर येण्याचा त्याचा एकच उद्देश होता, कारण त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने हा शो करावा. यामुळे अमिताभही खूप खूश झाले. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण शेअर केला. हेही वाचा -  Shahrukh khan: चित्रपट चालला नाही तर शाहरुख खान ला करावं लागेल ‘हे’ काम; वाचून वाटेल आश्चर्य अमिताभ बच्चन यांनी भारत-पाकिस्तान सामन्यात कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर ‘भारताचे राष्ट्रगीत’ गायले होते. राष्ट्रगीताबाबत अमिताभ म्हणाले की, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगुलीच्या विनंतीवरून त्यांनी कोलकातामध्ये भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राष्ट्रगीत गायले. बिग बी म्हणाले की, हा क्षण त्यांच्यासाठी खूप अविस्मरणीय होता. त्यांनी स्टेडियममध्ये राष्ट्रगीत गायल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणाचे वर्णनही केले.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, अमिताभ बच्चन या वयातही सक्रिय आहेत. अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर रोजी आपला 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्यासाठी खूप आनंदी आणि उत्सुक आहेत. अमिताभ यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आजतागायत ते प्रेक्षकांचे लाडके आहेत. त्यांच्याविषयी भरपूर आदर आजही दाखवला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात