मुंबई, 8 ऑक्टोबर : शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये पूर्णपणे बिझी आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख बऱ्याच वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. त्यामुळे त्याच्यासोबतच त्याच्या फॅन्सना सुद्धा 2023 मध्ये येणाऱ्या या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाशी संबंधित अपडेट्सही तो देत असतो. या चित्रपटाबद्दल शाहरुख खानने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. एका ट्विटद्वारे त्याने चित्रपटातील कलाकारांसोबतच्या त्याच्या बॉन्डिंगबद्दल सांगितले आहे. त्याचसोबत या पोस्ट मध्ये शाहरुखने अजब इच्छा व्यक्त केली आहे. शाहरुखने केलेल्या या ट्वीटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली कुमारच्या ‘जवान’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनाआधीपासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. टीझरमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे शाहरुख खान एका वेगळ्या अवतारात चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचीही या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाबद्दल शाहरुख खानने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटातील इतर कलाकारांनाही टॅग केलं आहे. पोस्ट शेअर करत शाहरुखने ‘चिकन 65’ ची रेसिपी शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हेही वाचा - Gauri Khan B’day: शाहरुख खानची पत्नी करते ‘हे’ काम; स्वतः कमावलीय इतक्या कोटींची संपत्ती शाहरुखने आपल्या ट्विटमध्ये सेटवर केलेल्या धमाल-मस्तीसह चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. शाहरुखने लिहिलंय कि, “हे 30 दिवस फारच छान होते. थलावयादेखील(सुपरस्टार रजनीकांत) सेटवर हजर होते. नयनतारा बरोबर चित्रपट पाहिले तर अनिरुद्धशी खूप छान गप्पा मारल्या. विजय सेतुपती आणि थलापति विजयने खाऊ घातलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. अटली आणि प्रियाचे केलेल्या आदरातिथ्यासाठी मन:पुर्वक धन्यवाद!”, असं शाहरुखने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. पण याच ट्विटमध्ये पुढे त्याने “ आता मला चिकन 65 ची रेसिपी शिकायची आहे.”, असं देखील म्हटलं आहे.
Wot a 30 days blast RCE team! Thalaivar blessed our sets…saw movie with Nayanthara partied with @anirudhofficial deep discussions with @VijaySethuOffl & Thalapathy @actorvijay fed me delicious food.Thx @Atlee_dir & Priya for ur hospitality now need to learn Chicken 65 recipe!
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 7, 2022
शाहरुख खान त्याच्या चित्रपटांच्या मार्केटिंगसाठी ओळखला जातो. ‘जवान’ चित्रपटाच्या सेटच्या या इनसाइड स्टोरीद्वारे सांगण्यात आले आहे की, या चित्रपटात साऊथचे स्टार्सही दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा आहे. नयनतारा साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. याशिवाय, साऊथचा प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती आणि थेलापती विजय हे देखील चित्रपटात असणार आहेत. तसेच या चित्रपटादरम्यान स्टारकास्टला रजनीकांत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. साहजिकच हा प्रत्येकासाठी खास अनुभव असेल.
विशेष म्हणजे शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत ‘जवान’ची निर्मिती केली जात आहे. गौरी खान याची निर्मिती करत आहे. या चित्रपटासह शाहरुख खानने ‘पठाण’ चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. पुढच्या वर्षी २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यानंतर ‘जवान’ पुढच्या वर्षी 2 जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल तीन वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे शाहरुखचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता आतुर झाले आहेत.