मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नसीब चित्रपटातील क्लायमॅक्स कसा शूट केला? 40 वर्षानंतर बिग बींनी सांगितलं गुपित

नसीब चित्रपटातील क्लायमॅक्स कसा शूट केला? 40 वर्षानंतर बिग बींनी सांगितलं गुपित

नसीब चित्रपटातील एक फोटो शेअर करुन त्यामधील क्लायमॅक्सबाबत आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगितली.

नसीब चित्रपटातील एक फोटो शेअर करुन त्यामधील क्लायमॅक्सबाबत आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगितली.

नसीब चित्रपटातील एक फोटो शेअर करुन त्यामधील क्लायमॅक्सबाबत आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगितली.

मुंबई 24 जून: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही काळापासून ते आपल्या जुन्या चित्रपटातील काही गंमतीशीर किस्से सांगत आहेत. (Amitabh Bachchan funny scenes) यावेळी त्यांनी नसीब (Naseeb) या सुपरहिट चित्रपटातील एक किस्सा सांगितला. त्यांनी नसीब चित्रपटातील एक फोटो शेअर करुन त्यामधील क्लायमॅक्सबाबत आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगितली.

1981 साली प्रदर्शित झालेला नसीब हा अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील एक सुपरहिट चित्रपट होता. बिग बी आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांची जबरदस्त केमिट्री आणि अफलातून गाणी यामुळं 80च्या दशकात नसीबने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील क्लायमॅक्स सीनची आजही तितकीच स्तुती केली जाते. परंतु हा सीन शूट करण्यासाठी दिग्दर्शकानं एक अनोखी शक्कल लढवली होती. आज 40 वर्षानंतर बिग बींनी ते गुपीत आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे.

...म्हणून सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माला घालायाची शिव्या; केला धक्कादायक खुलासा

सुमोन चक्रवर्तीनं कशी सोडली सिगरेट? व्यसनमुक्तीसाठी दिल्या खास टिप्स

नसीब चित्रपटातील क्लायमॅक्सस चांदिवली येथील एका स्टुडियोमध्ये शूट करण्यात आलं होतं. या स्टुडिओमध्ये एक गेमिंग रेस्तरॉ तयार करण्यात आलं. यामध्ये एक फिरता सेट देखील तयार करण्यात आला होता. या सेटचा वापर क्लायमॅक्स सीनसाठी करण्यात आला. आज तो सीन पाहिला की स्पेशल इफेक्ट केल्याचा भास होतो. परंतु त्याकाळी दिग्दर्शकानं आपली शक्कल लढवून तो इफेक्ट निर्माण केला होता. हा किस्सा बिग बींनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितला. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Entertainment, Movie review