मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /...म्हणून सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माला घालायाची शिव्या; केला धक्कादायक खुलासा

...म्हणून सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माला घालायाची शिव्या; केला धक्कादायक खुलासा

‘केवळ पैशांसाठी सहन करत होते’; कपिल शर्माच्या त्या कृतीवर सुमोना चक्रवर्तीनं व्यक्त केला राग

‘केवळ पैशांसाठी सहन करत होते’; कपिल शर्माच्या त्या कृतीवर सुमोना चक्रवर्तीनं व्यक्त केला राग

‘केवळ पैशांसाठी सहन करत होते’; कपिल शर्माच्या त्या कृतीवर सुमोना चक्रवर्तीनं व्यक्त केला राग

मुंबई 24 जून: द कपिल शर्मा शोमुळं (The Kapil Sharma Show) घराघरात पोहोचलेली सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) आज छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सुमोनानं आजवर अनेक मालिकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु तिला खरी ओळख मिळाली ती द कपिल शर्मा शोमुळं. परंतु या शोमध्ये काम करताना ती फारशी खुश नव्हती. तिला प्रसिद्धी आणि पैसे मिळत होते. परंतु कपिलच्या विनोदांमुळं तिचा आत्मसन्मान मात्र सातत्यानं दुखावला जात होता. अशा वेळी वैतागलेली सुमोना मनातल्या मनात कपिलला शिव्या घालून आपला राग व्यक्त करायची.

सुमोनानं काही वर्षांपूर्वी अभिनेता राजीव खंडेलवाल याला दिलेल्या मुलाखातीत आपल्या करिअरवर भाष्य केलं होतं. त्यावेळी तिनं द कपिल शर्मा शोमधील आपल्या अनुभव सांगितला. कपिल शर्मा अनेकदा तुझ्या शरीरावर विनोद करायचा. तुझे ओठ बदकासारखे आहेत अशी खिल्ली उडवायचा. त्यावेळी तुला कसं वाटायचं? असा सवाल राजीवनं सुमोनाला केला.

HBD: सुमोन चक्रवर्तीनं कशी सोडली सिगरेट? व्यसनमुक्तीसाठी दिल्या खास टिप्स

यावर उत्तर देताना ती म्हणाली, “सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचंय. मी एकटी असताना यावर विचार देखील करायचे. अशा प्रकारच्या विनोदांमुळं माझा आत्मसन्मान दुखावला जात होता. मग मी अशा वेळी कपिल शर्माला मनातल्या मनात शिव्या घालून आपला राग व्यक्त करायचे. त्यामुळं माझी घुसमट व्हायची नाही. कालांतरानं मला याची सवय झाली. कदाचित मला त्याचेच पैसे मिळत होते. त्यामुळं मी याबाबत मी तक्रार केली नाही. याला बॉडी शेमिंग म्हणायचं की नाही? या बाबत आजही माझा गोंधळ आहे. त्यामुळं याबाबत मी विचार करणं आता थांबवलं आहे.”

First published:

Tags: Kapil sharma, The kapil sharma show, Tv actress