मुंबई 6 मार्च: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट्स, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अलिकडेच त्यांनी एका ब्लॉगच्या माध्यमातून त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती दिली होती. शिवाय बरं होण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार असंही ते म्हणाले होते. परिणामी चाहते चिंतेत होते. मात्र बिग बींनी देखील चाहत्यांची काळजी वाढवली नाही. शस्त्रक्रिया होताच त्यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. ते म्हणाले मी दृष्टीहीन झालोय पण दिशाहिन नाही…. बिग बींचे वडिल हरिवंशराय बच्चन एक नामांकित कवी होते. त्यांच्या कवितांद्वारे अमिताभ अनेकदा आपल्या चाहत्यांशी संपर्क साधतात. यावेळी देखील त्यांनी स्वत:ची स्थिती सांगण्यासाठी कवितेचा आधार घेतला आहे. (Amitabh bachchan post poem after eye surgery) हूँ दृष्टि हीन ,पर दिशा हीन नहीं मैं, हूँ सुविधा हीन, असुविधा हीन नहीं मैं । सहलाने वालों की , मृदु है संगत , बहलाने वाले सब , यहाँ सुसज्जित । स्वस्थ रहने का प्यार मिला ; हृदय प्रफुल्लित आभार खिला ; कुछ क्षण के लिए हूँ मैं समय बद्ध , प्रार्थनाओं के लिए हूँ मैं करबद्ध हाँ हूँ करबद्ध , सदा मैं करबद्ध ।। ही कविता त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. या कवितेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी डोळ्यांची शस्त्रक्रिया केली होती अशी शंका व्यक्त केली जात आहे. अवश्य पाहा - ‘माझ्यासाठी कोणीतरी नवरा शोधा’; 42 वर्षीय अभिनेत्रीला करायचंय लग्न
अमिताभ यांनी आपल्या सर्जरीविषयीची माहिती आपल्या ब्लॉगमधून शनिवारी दिली होती. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे, “मेडिकल कंडिशन…सर्जरी…मी लिहू शकत नाही, एबी”. अमिताभ यांचा हा ब्लॉग पाहिल्यानंतर चाहतेही चिंतेत पडले आहेत. अमिताभ ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना दररोजची माहिती देत असतात. मात्र, आता त्यांच्या या छोट्याशा वाक्यानं चाहत्यांना चिंतेत टाकलं होतं. कारण नेमकी कसली सर्जरी आहे. ती कधी आणि कुठे केली जाणार आहे, या गोष्टीची माहिती देखील यामध्ये त्यांनी दिली नव्हती.