मुंबई, 20 जानेवारी- बॉलिवूड बिग बी अर्थातच अभिनेते अमिताभ बच्चन वयाच्या ऐंशीतसुद्धा सुपर फिट आहेत. अमिताभ बच्चन अजूनही पडद्यावर आणि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असतात. नुकतंच अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनाल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार आणि एम्बाप्पे यांना भेटताना दिसून येत आहेत. सध्या हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आज सकाळी ट्विट करत एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहे. सौदी अरेबियाच्या रियाध याठिकाणी सुरु असलेल्या पीएसजी आणि सौदी ऑल स्टार इलेव्हन सामन्यात अमिताभ बच्चन यांनी खास उपस्थित लावली होती. हे सामने फहद आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरु आहेत. या सामन्याच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांनी मैदानावर जाऊन सर्व खेळाडूंची भेट घेतली. हा व्हिडीओ शेअर करत अमिताभ बच्चन यांनी आनंद व्यक्त केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन सामना सुरु होण्यापूर्वी मैदानावर जात सर्व खेळाडूंना भेटताना दिसून येत आहेत. सुरुवातीला अमिताभ बच्चन नेमारला भेटतात. त्यांनतर एम्बाप्पेची भेट घेतात. पुढे जात ते लिओनल मेस्सीला भेटतात बिग बी त्याच्याशी संवाददेखील साधतात. त्यांनतर अमिताभ बच्चन ख्रिस्तियानो रोनाल्डोची भेट घेतात आणि त्यालासुद्धा काहीतरी सांगताना दिसून येतात. यावेळी रोनाल्डोसुद्धा खळखळून हसतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
T 4533 - "An evening in Riyadh .. " what an evening .. Cristiano Ronaldo, Lionel Messi, Mbape, Neymar all playing together .. and yours truly invited guest to inaugurate the game .. PSG vs Riyadh Seasons .. Incredible !!!#football #Ronaldo #Messi #AlNassr #SaudiArabia pic.twitter.com/fXlaw9meeV
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 20, 2023
अमिताभ बच्चन नुकतंच सूरज बडजात्यांच्या 'उंचाई' या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत अनुपम खैर, बोमन इराणी आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होते. त्यांनतर अमिताभ बच्चन आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ब्लॉकबस्टर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसले होते. आगामी काळात अमिताभ बच्चन साऊथ स्टार प्रभास आणि दीपिका पादुकोण यांच्या के प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत. तर दीपिका पादुकोणसोबत द इंटर्न मध्येही झळकणार आहेत.
अमिताभ बच्चन सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतात. ते सतत सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओस शेअर करत असतात. लोक त्यांच्या प्रत्येक पोस्टवर भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद देत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Football