बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्ये आपला जलवा दाखवत आहे.अभिनेत्री विविध सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना चकित करत आहे. दरम्यान प्रियांका चोप्रा विविध जागतिक कार्यक्रमांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करुन देशाचा मानसन्मान वाढवत आहे. अभिनेत्रीने नुकतंच आपले काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने पहिल्यांदाच आपली मुलगी मालती मेरी चोप्रासोबत फोटोशूट केलं आहे. प्रियांका चोप्राने खास नामांकित ब्रिटिश वोग मॅगझीनसाठी हे फोटोशूट केलं आहे. यामध्ये अभिनेत्री आपल्या लेकीसोबत पोझ देताना दिसून येत आहे. परंतु मालतीचा चेहरा नेहमीप्रमाणे यामध्ये लपविण्यता आला आहे. विशेष म्हणजे ब्रिटिश वोग कव्हरसाठी फोटोशूट करणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. आणि ही अनेक महत्वाची बाब आहे. प्रियांका चोप्रा अशी एकमेव भारतीय अभिनेत्री आहे जी तब्बल 40 विविध आंतरराष्ट्रीय मॅगझीनच्या कव्हर फोटोवर झळकली आहे. निक जोनससोबत लग्नानंतर प्रियांका चोप्रा न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाली आहे.