बिग बींची अनेक महिन्यांची ‘ती’ इच्छा अखेर झाली पूर्ण

बिग बींची अनेक महिन्यांची ‘ती’ इच्छा अखेर झाली पूर्ण

त्यांची ही इच्छा जाणून तुम्हालाही त्यांचा अभिमानच वाटेल आणि सैनिकांकडून त्यांचं कौतुक का केलं जातंय तेही कळेल.

  • Share this:

मुंबई, १४ जून- आपलं सामाजिक भान जपण्यात बॉलिवूड कलाकार मागे नाहीत. मुख्य म्हणजे ज्या प्रेक्षकांच्या बळावर त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचण्याची संधी मिळते त्याच समाजाचे आपण ऋणी असतो हीच भावना जाणत मग अडचणीच्या वेळी ही सेलिब्रिटी मंडळीसुद्धा पुढे सरसावतात. बिग बी अमिताभ बच्चन हे त्यातीलच एक नाव. बिहारमधील शेतकऱ्यांचं कर्ज फेडल्यानंतर या महानायकाने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

हेही वाचा- आदित्यची पत्नी म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला डेट करायची कंगना, तिला मुलगी कशी मानू?’

‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पुलवामा हल्ल्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या कुटुंबाला बिग बींनी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांनी या विषयीची माहिती दिली. ‘आणखी एक इच्छा पूर्ण झाली. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची माझी इच्छा होती आणि ती मी केली. सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमक्ष मी ही मदत केली’, असं त्यांनी लिहिलं. भारतीय प्रशासन आणि जवानांच्या खासगी खात्यांच्या मदतीने बच्चन यांनी सढळ हस्ते ही मदत केली आहे.

हेही वाचा- बॉलिवूडचे 4 सेलिब्रिटी जे एकटेच सांभाळतायेत आई- बापाची जबाबदारी

अमिताभ बच्चन यांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. एक कलाकार म्हणून शक्य त्या सर्व परिंनी गरजूंची मदत करण्याची त्यांची ही वृत्ती अनुकरणीय ठरत आहे. फेब्रुवारी महिन्यात सीआरपीएफ जवानांच्या वाहनांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. अतिशय भीषण स्वरुपाच्या या हल्ल्यात घटनास्थळीच 40 जवान शहीद झाले होते. तर, हा आकडा आणखी वाढल्याचंही म्हटलं गेलं होतं. या हल्ल्याचा संपूर्ण देशातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही तीव्र निषेध करण्यात आला होता.

VIDEO : नानांना क्लीन चिट; तनुश्री म्हणते, पोलीसच भ्रष्टाचारी!

First published: June 14, 2019, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading