मुंबई, 7 नोव्हेंबर- बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासाठी यंदाची दिवाळी खूप खास होती. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र आले आणि अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोत अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकत्र दिसत होता. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. हा फोटो चर्चेत येण्यामागं एकच कारण आहे. या फोटोत असलेल्या पेंटिंगमुळे याची चर्चा रंगलेली आहे. या पेंटिंगची किंमत कोटीच्या घरामध्ये आहे.
व्हायरल होत आहे फोटो
अमिताभ यांनी हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत संपूर्ण बच्चन कुटुंब दिसत आहे. मात्र, काही नेटकऱ्यांचे लक्ष हे बच्चन कुटुंबाच्या पाठी असलेल्या पेंटिंगने वेधले आहे. या पेंटिंगमध्ये एक मोठा बैल दिसत आहे.ज्याचे पुढचे पाय थेट त्याच्या शेपटीला जोडलेले आहेत. हे पेंटिंग पाहातचा प्रत्येक चाहत्याचे लक्ष वेधून घेत आहे. ही बैलाची पेंटिंग पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल देखील केले आहे. ही बैलाची पेंटिंग पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी वेलकम या चित्रपटातील मजनू भाईने ही पेंटिंग काढली ना असं म्हटलं आहे.
View this post on Instagram
पेंटिंगची किंमत ही 4 कोटी
या व्हायरल झालेल्या पेंटिंगची किंमत ही 4 कोटी रुपयांच्या आसपास आहे. ही पेंटिंग मनजित बावा यांनी काढली आहे. मनजित हे पंजाबमधले होते.
वाचा : 'सोनम - रिया तुमची आठवण येतेय...'; अनिल कपूर यांची भावनिक पोस्ट
मनजित बावा कोण आहेत ?
मनजीत यांचा जन्म पंजाबमधील धुरी येथे झाला होता. मनजित यांना अशा पेंटिंग काढण्याची प्रेरणा ही पौराणिक कथा आणि सुफी फिलॉसॉफीमधून मिळाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पेंटिंगमध्ये काली, शिवा या देवतांच्या प्रतिमांचे समावेश पेंटिंगमध्ये असतो. प्राणी, निसर्ग, बासरीच्या आणि मनुष्य आणि प्राण्याच्या सह-अस्तित्वाची कल्पनांचा समावेश त्यांच्या पेंटिंगमध्ये होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abhishek Bachchan, Amitabh Bachchan, Bollywood News, Entertainment