जितेंद्र जाधव, 27 जानेवारी : बॉलिवूड बिग बी अर्थातच अभिनेते अमिताभ बच्चन वयाच्या ऐंशीतसुद्धा सुपर फिट आहेत. अमिताभ बच्चन अजूनही पडद्यावर आणि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सुपरस्टार अमिताभ बच्चन कायम चर्चेत राहतात. अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच त्यांचे कुटुंबीय सुद्धा कायम चर्चेत राहतात. अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा त्यांची लेक नव्या नवेली मुळे नेहमीच चर्चेत असते. आता बिग बींची लेक श्वेता सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती नेहमी तिचे आणि कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता त्यांची लेक खास बारामतीत आली आहे.
बारामतीत आज सकाळी सुपरस्टार अमिताभ बच्चन याची कन्या श्वेता बच्चन नंदा यांचं आगमन झाली. त्या स्पेशल विमानाने बारामतीत आल्या आहेत. त्यांच्या स्वागतासाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे त्यांचे पती सदानंद सुळे हे स्वतः बारामतीचे एअरपोर्टवर उपस्थित होते. त्या एकट्याच नाही तर त्यांच्या समवेत अजून तीन चार मैत्रिणी देखील आहेत. बारामतीत त्यांनी मराठमोळा पाहुणचार घेतला आहे.
अमिताभ बच्चन याची कन्या श्वेता बच्चन नंदा यांनी आज बारामतीच्या विकासाची पाहणी केली. नंतर त्यांनी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट इंक्युबॅशन सेंटर येथे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे स्नेहसंमेलन द्वारे त्यांचे स्वागत केले यावेळी सेंटर येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित होत्या. परंतु या संदर्भात संपूर्णता गोपनीयता पाळली असून बारामतीत बच्चन कुटुंबातील या व्यक्ती कशासाठी आले आहेत याची कुणालाही कल्पना देण्यात आली नाही.
अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन यांची लेक नव्या नवेली ही देखील प्रसिद्ध पॉडकास्ट करते. तर त्यांचा मुलगा अगस्त्य हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलिवूडचे सुहाना खान, ख़ुशी कपूर या स्टारकिडसह अगस्त्य 'अर्चिस' मधून पदार्पण करणार आहे. त्याच्या पदार्पणासाठी बच्चन कुटुंबीय उत्सुक आहेत.
अमिताभ बच्चन नुकतंच सूरज बडजात्यांच्या 'उंचाई' या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत अनुपम खैर, बोमन इराणी आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर अमिताभ बच्चन आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ब्लॉकबस्टर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसले होते. आगामी काळात अमिताभ बच्चन साऊथ स्टार प्रभास आणि दीपिका पादुकोण यांच्या के प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत. तर दीपिका पादुकोणसोबत द इंटर्न मध्येही झळकणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Shweta bachchan nanda