Home /News /entertainment /

सनी लियोनीचे शेजारी होताच बिग बींना होतोय त्रास; ब्लॉगद्वारे व्यक्त केला संताप

सनी लियोनीचे शेजारी होताच बिग बींना होतोय त्रास; ब्लॉगद्वारे व्यक्त केला संताप

सनीच्या शेजारी जाताच बिग बींना एक मोठा त्रास जावणू लागला आहे. अन् हा राग त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

    मुंबई 30 मे: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना महागड्या वस्तूंची प्रचंड हौस आहे. ते सतत महागड्या गाड्या, फर्निचर, पेंटिंग्स, कपडे वगैरे अशा वस्तू घेत असतात. शिवाय मोठ्या उत्साहानं आपल्या चाहत्यांना दाखवतात. यावेळी त्यांनी चक्क एक नवं घर खरेदी केलं आहे. (Amitabh Bachchan Buys new house) मुंबईतील लोखंडवाला कॉप्लेक्समध्ये त्यांनी तब्बल 31 कोटी रुपये खर्च करुन एक नवा कोरा फ्लॅट खरेदी केला. विशेष म्हणजे बिग बींच्या शेजारीच अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) राहते. त्यामुळं या फ्लॅटची प्रचंड चर्चा झाली. मात्र सनीच्या शेजारी जाताच बिग बींना एक मोठा त्रास जावणू लागला आहे. अन् हा राग त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. बिग बींना कविता खुप आवडतात. त्यांचे वडील हरीवंशराय बच्चन हे एक प्रसिद्ध कवी होते. आपल्या वडिल्यांच्या कविता ते सतत सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र त्यांच्या वडिलांच्या काही कविता हरवल्या आहेत. बिग बी जलसा बंगल्यात राहात होते. अन् आता ते आपलं बस्तान उचलून अंधेरीच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले आहेत. परंतु या शिफ्टिंग दरम्यान त्यांच्या वडिलांची काही हस्तलिखीत कागदपत्र हरवली आहेत. त्यांनी दिवसभर ती शोधली मात्र अद्याप सापडली नाहीत. परिणामी बिग बी प्रचंड संतापले असून त्यांनी आपला हा राग ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. त्याचा हा ब्लॉग सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. कंगना रणौतच्या बॉडीगार्डला अटक; महिलेने केले बलात्काराचे आरोप सेलिब्रेटी मीरा चोपडा लस प्रकरणाची चौकशी होणार; तीन दिवसांत सत्य येणार समोर अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील अंधेरी या ठिकाणी एक अलिशान घर त्यांनी खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे हे डुप्लेक्स अपार्टमेंट आहे. 5184 स्के. फु. इतकं मोठं हे अपार्टमेंट आहे. 27 आणि 28 मजल्यावर हे अलिशान अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटला 6 कार पार्किंग स्पेस आहे. या नव्या कोऱ्या अपार्टमेंटसाठी बिग बींनी 31 करोड रुपये मोजले असल्याची माहिती मिळत आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Abhishek Bachchan, Amitabh Bachchan, Star celebraties, Sunny Leone, Tv celebrities

    पुढील बातम्या