मुंबई, 23 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळख असलेले अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसत आहेत. त्यामुळे ते या मंचावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमुळे चर्चेत असतात. सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या या लोकप्रिय शोमुळे बिग बी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अनेकवेळा बिग बी स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसत असले तरी काही वेळा स्पर्धक बिग बींसोबत मस्ती करताना पहायला मिळतात. ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या एका एपिसोडमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्टचे उत्तर देणारा स्पर्धक अनिकेत शंकर हॉटसीटवर बसला होता. अनिकेत मूळचा नागपूरचा असून तो सध्या शिक्षण घेत आहे. त्याने शोमध्ये सांगितले की, तो त्याच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी केबीसीमध्ये आला आणि तिच्या आशीर्वादामुळे तो इथपर्यंत पोहोचू शकला. यावेळी अनिकेतने अमिताभ यांच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या ज्यामुळे बिग बी लाजून लाल झालेले पहायला मिळाले. हेही वाचा - ‘ही’ आहे भारतातील पहिली स्टंटगर्ल; शोलेच्या शूटिंगदरम्यान मृत्यूच्या दारातून आली परत केबीसी स्पर्धक अनिकेतने यावेळी अमिताभ यांनी सांगितलं की, अमिताभ यांना केबीसीमध्ये पाहण्याच्या पहिले त्यांच्याविषयी भीती होती मनात. यासोबतच त्यानी बिग बींच्या स्टाईलचेही कौतुक केले आणि त्यांचा आवडता डायलॉग कोणता आहे हे सांगितले. ‘परंपरा, प्रतिष्ठा आणि शिस्त’, मोहब्बतें चित्रपटातील तुमचा डायलॉग मला खूप प्रभावित करतो. मी तुम्हाला आत्ता इथे पाहिलं आणि तुमच्या उपस्थितीने मला शांत केलं. तुमच्या वयाबद्दल मी बोलत नाही मात्र तुमच्यामधील एनर्जीची बरोबरी कोणीच करु शकत नाही. स्पर्धकाचं हे बोलणं ऐकूण अमिताभ लाजून लाल झाले.
दरम्यान, दरम्यान, सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणारा रिअॅलिटी क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ भारतातील अनेकांचा आवडता शो आहे. आत्तापर्यंत या शोचे 13 सीझन यशस्वीरित्या पूर्ण झाले असून सध्या 14 वा सीझन चांगलाच गाजत आहे.