KBC 12 चं Registraton संपलं, या बॉलिवूड अभिनेत्रीशी संबंधीत होता शेवटचा प्रश्न

KBC 12 चं Registraton संपलं, या बॉलिवूड अभिनेत्रीशी संबंधीत होता शेवटचा प्रश्न

सोनी टीव्हीवरील या लोकप्रिय शोची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 9 मे पासून सुरू झाली होती.

  • Share this:

मुंबई, 24 मे : सध्या कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातलेलं असतानाही अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित क्विज शो कौन बनेगा करोडपती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच या शोची घोषणा केली. एवढंच नाही तर तर या शोसाठी रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालं. हे रजिस्ट्रेशन आता 14 व्या प्रश्नावर संपलं आहे. अमिताभ बच्चन यांनी केबीसी रजिस्ट्रेशनचा शेवटचा प्रश्न विचारला आहे आणि विशेष म्हणजे हा प्रश्न खूपच सोपा आहे. कारण हा प्रश्न प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीशी संबंधीत आहे.

कौन बनेगा करोडपतीचा नवा सीझन लवकरच सुरू होत आहे. सोनी टीव्हीवरील या लोकप्रिय शोची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 9 मे पासून सुरू झाली होती. ज्यात रोज एक प्रश्न विचारला जात होता. आता केबीसीचं हे रजिस्ट्रेशन 14 व्या प्रश्नावर संपणार आहे. नुकताच अमिताभ बच्चन यांनी या रजिस्ट्रेशनसाठीचा शेवटचा प्रश्न विचारला.

'तारक मेहता'च्या 'गोगी'कडे नव्हतं अंथरूण, स्ट्रगल स्टोरी वाचून येईल डोळ्यात पाणी

केबीसी रजिस्ट्रेशनसाठीचा शेवटचा प्रश्न- एका गाण्यानुसार यापैकी कोणती अभिनेत्री देसी गर्ल आहे. जी त्याच गाण्यात अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहमसोबत दिसली होती. या प्रश्नासाठी पर्याय आहेत- A)कतरिना कैफ, B)अनुष्का शर्मा, C)करिना कपूर, D)प्रियांका चोप्रा. आता देसी गर्ल कोण हे तर सर्वांनाच माहित आहे. यासोबतच गाणं सुद्धा सांगितल्यान या प्रश्नाचं उत्तर देणं आणखी सोपं आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे D)प्रियांका चोप्रा. या शेवटच्या प्रश्नासोबतच केबीसीच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया संपली आहे.

शिल्पा शेट्टीनं या कारणासाठी राज कुंद्राशी केलं लग्न, 11 वर्षांनी झाला खुलासा

सपना चौधरीला स्टेजवर सर्वांसमोर तरुणानं केलं KISS, सोशल मीडियावर Photo Viral

First published: May 24, 2020, 10:53 AM IST

ताज्या बातम्या