मुंबई, 24 मे : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा टीव्ही शो सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. या शोमधील प्रत्येक पात्र खास आहे. प्रत्येक पात्रची स्वतःची वेगळी ओळख आहे. या शोमध्ये ‘गोगी’ नावाच्या मस्तीखोर मुलाची भूमिका साकारणार समय शाह साकारत आहे. गोगीच्या लाइफमध्ये आता तर सर्वकाही ठिक आहे. पण त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मात्र त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. आपण जीवनात ज्या गोष्टी ठरवतो त्या मिळवण्यासाठी अनेकदा आपल्या खूप कष्ट करावे लागतात. सुरुवात कठीण असते पण मग सर्वकाही ठिक होतं. असंच काहीसं समय शाहसोबतही घडलं. फार कमी लोकांना माहित आहे की समय शाहनं त्याच्या स्ट्रगलिंगच्या काळात अनेक गोष्टींचा सामना केला आहे. त्याच्या स्ट्रगलिंगच्या काळात त्याच्याकडे झोपण्यासाठी अंथरुण सुद्धा नव्हतं मुंबईमध्ये त्यानं अनेक रात्र फक्त जमिनीवर झोपून काढल्या आहे. समयनं ‘एक साक्षात्कार’ या कार्यक्रमात त्याच्या संघर्षाच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.
समयनं सांगितलं, असाही एक काळ होता जेव्हा माझ्याकडे जमिनीवर झोपण्यापालिकडे काहीच पर्याय नव्हता. मी त्यावेळी मुंबईमध्ये माझं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न बघत असे. समयचं हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे. एका वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार समय शाहनं 1.48 कोटींचं घर घेतलं आहे. समय एका एपिसोडसाठी 8 हजार रुपये मानधन घेतो. तारक मेहतामधील गोगीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

)







