जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / GoodBye Trailer: आईचा मृत्यू, कसे होणार अंत्यसंस्कार? रडवूनही हसायला लावणारा GOODBYE

GoodBye Trailer: आईचा मृत्यू, कसे होणार अंत्यसंस्कार? रडवूनही हसायला लावणारा GOODBYE

GoodBye Trailer: आईचा मृत्यू, कसे होणार अंत्यसंस्कार? रडवूनही हसायला लावणारा GOODBYE

अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, रश्मिका मंदाना स्टारर हा चित्रपटाविषयी अनेक चर्चा रंगलेल्या असातना चित्रपटाविषयी अपडेट समोर आली आहे. ‘गुडबाय’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षेत ट्रेलर प्रदर्शित झाला असून काही क्षणातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 सप्टेंबर: गेल्या बऱ्याच दिवसांपासून नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ‘गुडबाय’ चित्रपट चर्चेत आहे. अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, रश्मिका मंदाना स्टारर हा चित्रपटाविषयी अनेक चर्चा रंगलेल्या असातना चित्रपटाविषयी अपडेट समोर आली आहे. ‘गुडबाय’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला असून काही क्षणातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘गुडबाय’ चित्रपटाता ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधून कुटुंबातील बंध दाखवण्यात आले आहेत. या ट्रेलरमधून पहायला मिळतंय की, कॉमेडी, भावनिक साद, जॉब, मीर्च मसाला, सगळं मिळून एक हृदयस्पर्शी कथा मांडली आहे.अचानक आईच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबच विस्कळीत होत असल्याचं दिसत आहे. एकंदरीत हा संपूर्ण फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाच्या पोस्टर्सप्रमाणेच, त्याचा ट्रेलर देखील नेत्रदीपक आहे. अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टा अकांउंटवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्यांनी लिहिलं की, ‘वेडेवाकडे तर सगळेच आहेत. मात्र कुटुंबाची सोबत असेल तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतात’.

जाहिरात

‘गुडबाय’ चित्रपटात रश्मिका मंदान्ना अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. नीना गुप्ता या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना वडील आणि मुलगी यांच्यातील आंबट-गोड बॉन्डिंग पहायला मिळणार आहे. ट्रेलरवरुन चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हेही वाचा -  गोविंदाच्या आयकॉनिक चित्रपटाचा बनणार रिमेक, Shahrukh Khan बनणार ‘दुल्हे राजा’ दरम्यान, ‘गुडबाय’मध्ये अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय नीना गुप्ता, पावेल गुलाटी, एली अविराम, सुनील ग्रोवर आणि साहिल मेहता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे आता चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात