जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / गोविंदाच्या आयकॉनिक चित्रपटाचा बनणार रिमेक, Shahrukh Khan बनणार 'दुल्हे राजा'

गोविंदाच्या आयकॉनिक चित्रपटाचा बनणार रिमेक, Shahrukh Khan बनणार 'दुल्हे राजा'

shahrukh khan

shahrukh khan

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान सध्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो बराच काळापासून पडद्यावर दिसला नसला तरी तो बऱ्याच चित्रपटांमधून धमाका करायला सज्ज झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 सप्टेंबर: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान सध्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो बराच काळापासून पडद्यावर दिसला नसला तरी तो बऱ्याच चित्रपटांमधून धमाका करायला सज्ज झाला आहे. अशात किंग खानविषयी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलीये. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार शाहरुख खान लवकरच एक रिमेक चित्रपट बनवणार आहे. हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून 1998 मधील आयकॉनिक कॉमेडी चित्रपट ‘दुल्हे राजा’ आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री रवीना टंडनने सर्वांची मनं जिंकली होती. अशातच या आयकॉनिक चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार म्हटल्यावर प्रेक्षक तर कमालीचे उत्सुक आहेत. शिवाय सिक्वेलमध्ये शाहरुख खान दिसणार म्हटल्यावर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. हेही वाचा -  Tiger 3: अखेर सलमान-शाहरुखला ‘टायगर 3’ साठी मिळाला वेळ, कधी करणार शूटिंग? शाहरुख खानच्या आयकॉनिक कॉमेडी चित्रपट ‘दुल्हे राजा’ चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे शाहरुख खान 90 च्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दुल्हे राजा’चा रिमेक करण्याचा विचार करत आहे. दुल्हे राजा या चित्रपटाच्या रिमेकच्या स्क्रिप्टवरही त्यांनी काम सुरू केले आहे. मात्र, दुल्हे राजा या चित्रपटात कोणते कलाकार काम करणार आहेत. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, शाहरुख खानबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमानच्या टायगर 3 मध्ये शाहरुखही कॅमिओ करताना दिसणार आहे. यासाठी त्यानं व्यग्र शेड्युलमधून वेळही काढल्याचं समोर आलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात