मुंबई, 28 ऑक्टोबर: सोनी वाहिनीवरील ‘इंडियन आयडॉल’ हा शो जेवढा लोकप्रिय आहे. तेवढाच विवादित शो म्हणून ओळखला जातो. मागच्या महिन्यात या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची जोरदार सुरुवात झाली आहे. तेव्हाच रितो रिबा या स्पर्धकाला शो मध्ये न घेतल्याने प्रेक्षकांनी हा शो बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. पण ते प्रकरण तेव्हाच निवळलं. पण आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. या वादाचं कारण म्हणजे शो मध्ये किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांची झालेली एंट्री आहे. प्रेक्षकांना त्यांना या शो मध्ये बोलावणं पसंत पडलेलं नाही. ‘इंडियन आयडॉल’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार याच्या जजच्या भूमिकेत एंट्री झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही या शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू झाली आहे. अमित कुमार यांनी गेल्या वर्षी इंडियन आयडॉलवर बरीच टीका केली होती आणि अनेक प्रकारचे दावे केले होते. आता या मुद्द्यावरून त्यांच्यावर ताशेरे ओढले जात आहेत. हेही वाचा - Shiv Kumar Khurana passes away: बॉलिवूडवर पुन्हा शोककळा; विनोद खन्ना सारखा सुपरस्टार घडवणाऱ्या शिवकुमार खुराना यांचं निधन इंडियन आयडॉलचा नवा प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार, शोचा आगामी भाग ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांना आदरांजली देणारा असेल. या प्रोमोमध्ये अमित कुमार शो मध्ये पाहुणे म्हणून सहभागी झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर अमित यांनी 70 ते 90 च्या दशकात अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. सोनी टीव्हीने गुरुवारी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर या आगामी भागाचा प्रोमो पोस्ट केला. पाहुणे म्हणून आलेल्या अमित कुमार यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. त्याच वेळी, इंडियन आयडॉल 13 ची स्पर्धक बिदिप्ताच्या गायनाची देखील जोरदार प्रशंसा झाली आहे. या वर्षी इंडियन आयडॉलवर बरीच टीका केली होती आणि अनेक प्रकारचे दावे केले होते. आता या मुद्द्यावरून त्यांच्यावर ताशेरे ओढले जात आहेत.
अमित कुमारला ‘इंडियन आयडॉल 11’ मधील किशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. जेव्हा शो ऑन एअर झाला तेव्हाच लोकांनी प्रश्न केला की स्पर्धकांचे गाणे खराब होते, तरीही जज त्यांचे कौतुक करत होते. या एपिसोडनंतर अमित कुमार यांनी मीडियाशी बोलताना या शोवर जोरदार टीका केली. अमित कुमारने खुलासा केला होता की, त्याला निर्मात्यांच्या वतीने सांगण्यात आले होते की, तुम्हाला सर्व स्पर्धकांचे कौतुक करावे लागेल. यामुळे अमित चांगलाच संतापला होता.
यासोबत ते म्हणाले होते की, मला स्पर्धकांची गाणी अजिबात आवडत नाहीत. पैशांमुळे हा शो केल्याचा खुलासाही त्याने केला. अमितच्या या बोलण्यानंतर शोचे होस्ट आदित्य नारायण यांनी पलटवार करत आपली बाजू मांडली. आदित्यने सांगितले होते की, जर त्याला अशी अडचण आली असती तर तो शोदरम्यानच बोलला असता. या प्रकरणावरून सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला होता. प्रोमो समोर आल्यापासून युजर्स सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे देत आहेत. ऋषभ नावाच्या यूजरने लिहिले की, ‘मी या बनावट गोष्टी बघून कंटाळलो आहे.’ एका यूजरने लिहिले की, ‘गेल्या सीझनमध्ये अमित कुमारने वाद निर्माण केला. आता पुन्हा कॉल केला.’ योगेश नावाच्या युजरने लिहिले की, ‘मेकर्स प्रत्येक वेळी एकच कल्पना का आणतात? यामुळे शो कंटाळवाणा होतो.यासोबतच अनेक यूजर्सनी शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.