जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आता 'झोंबिवली'मध्ये होणार अनलॉक! काय आहे अमेय वाघच्या पोस्टमागचा अर्थ?

आता 'झोंबिवली'मध्ये होणार अनलॉक! काय आहे अमेय वाघच्या पोस्टमागचा अर्थ?

आता 'झोंबिवली'मध्ये होणार अनलॉक! काय आहे अमेय वाघच्या पोस्टमागचा अर्थ?

अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी या कलाकारांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवरील कॅप्शन वाचून त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जुलै : लॉकडाऊन काळात सिनेमागृहांमध्ये कोणताही चित्रपट पाहायला न मिळाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. मात्र आता हळूहळू नवीन चित्रपटांची घोषणा होऊ लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी थिएटरमध्ये सिनेमा पाहता येईल अशी अपेक्षा प्रेक्षकवर्ग करत आहे. दरम्यान या कालावधीमध्ये चाहत्यांशी जोडले राहण्यासाठी जवळपास सर्वच कलाकारांनी सोशल मीडियाचा वापर केला आहे. सध्या नवीन चित्रपटांची घोषणा देखील सर्वात आधी सोशल मीडियावर केली जाते. अशावेळी सिनेमाचे पोस्टर तर आकर्षित करणारे असतेच, पण त्याचबरोबर सोशल मीडियावर ते पोस्टर शेअर करताना देण्यात येणाऱ्या काही कॅप्शन देखील भन्नाट असतात. ‘झोंबिवली’ हा सिनेमा 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. यामध्ये अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर हे ताकदीचे कलाकार दिसणार आहे. याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केले आहे. (हे वाचा- आशुतोषने का उचलले टोकाचे पाऊल? पोलिसांनी सापडली नाही सुसाइड नोट ) दरम्यान या सर्व कलाकारांनी सिनेमाचे पोस्टर त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे, आणि हे पोस्टर शेअर करताना त्यांनी ‘2020- लॉकडाऊन इन डोंबिवली 2021- अनलॉक इन झोंबिवली’, असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

जाहिरात

क्लासमेट्स, माऊली, फास्टर फेणे या सुंदर चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा आदित्य सरपोतदार मराठीत पहिल्यादा ‘झॉम-कॉम’ सिनेमा घेऊन येत आहे. यामध्ये ललित, अमेय आणि वैदेही झोम्बींशी लढताना दिसतील. सध्या सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचे पालन करत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अशावेळी असा रंजक विषय हाताळण्याचे आवाहन आदित्य सरपोतदार समोर आहे. झी 24 तासने दिलेल्या वृत्तानुसार या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला. त्याचप्रमाणे या सिनेमातील काही सीन्सचे शूटिंग लवकरच लातूरमध्ये केले जाणार आहे. सारेगम प्रस्तुत आणि Yoodlee Films निर्मित ‘झोंबिवली’ हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या बेटीला येणार आहे.

जाहिरात

नावावरून हे कथानक डोंबिवलीमधील असणार आहे, हे स्पष्ट होत आहे. दरम्यान बऱ्याच कालवधीनंतर मराठीमध्ये हॉरर-कॉमेडी पाहायला मिळणार आहे. कथानक काय असणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. या सिनेमामध्ये वैदेही, ललित आणि अमेय हे फ्रेश चेहरे दिसणार असल्याने सर्वानाच याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. अनेक कलाकारांनी देखील या तिघांच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांना या सिनेमा पाहण्यासाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात