मुंबई, 10 फेब्रुवारी- प्रसिद्ध अमेरिकन पॉप स्टार (American Pop Star) रिहाना (Rihanna) लवकरच आई बनणार आहे. तिने स्वतः ही गुड न्यूज शेअर केली आहे. आजकाल ती तिचा प्रेग्नेंसीकाळ एन्जॉय करत आहे. पॉप स्टार लवकरच तिचा बॉयफ्रेंड आणि रॅपर एएसएपी रॉकीसह (ASAP Rocky) नवीन पाहुण्याचं स्वागत करणार आहे. आजकाल रिहानाच्या बेबी बम्पचे बरेच फोटो व्हायरल होत आहेत. अलीकडेच रिहानाने बेबी बम्प दाखवत (Rihanna flaunts baby bump) आपल्या बॉयफ्रेंडसोबत जबरदस्त पोज दिली होती. आता तिनं समोर ओपन ब्लॅक टॉपमध्ये बेबी बम्प फ्लॉंट केलं आहे. ज्याचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.
रिहाना आणि रॅपर एएसएपी रॉकी आजकाल त्यांच्या पहिल्या मुलासाठी खूप उत्सुक आहेत. अलीकडे, व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये, गायिकेने घट्ट जेगिंगसह समोर ओपन असलेला ब्लॅक टॉप घातला आहे. यासोबत रिहानाने काळी टोपी घातली आहे. यामध्ये रिहानाचा बेबी बम्प समोरून स्पष्ट दिसत आहे.
यामध्ये तिनं आपलं डोकं झाकलं आहे. गडद तपकिरी रंगाच्या लिपस्टिकमध्ये रिहानाचा लूक किलर दिसत आहे. रिहाना आणि तिचा बॉयफ्रेंड एएसएपी रॉकीने 2021 मध्ये सार्वजनिकपणे त्यांचं नातं उघड केलं होतं. रिहाना एक अब्जाधीश आहे. ती तिच्या मेकअप, लॉन्जरी आणि फॅशन ब्रँडच्या यशाने लग्जरी आयुष्य जगत आहे. रिहानाचा शेवटचा स्टुडिओ रिलीज 2016 मध्ये झाला होता. चाहते त्याच्या पुढच्या अल्बमची वाट पाहत आहेत.
या 33 वर्षीय गायिकेने आधीच कुटुंब बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रिहानाला खूप दिवसांपासून आई व्हायचं होतं. आणि आता ती तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याने ती खूप आनंदी आहे. दुसरीकडे, रिहानाच्या बेबी बम्पच्या फोटोंचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे.
(हे वाचा:Gehraiyaanच्या स्क्रिनिंगनंतर कपिल झाला रोमँटिक,सर्वांसमोरच पत्नीला केलं Kiss )
रिहानाने 2019 मध्ये न्यूयॉर्क शहरातील तिच्या पाचव्या डायमंड बॉलमध्ये ती मातृत्वाबद्दल व्यक्त झाली होती. ती म्हणाला- 'मी एक श्वेतवर्णीय स्त्री आहे. कारण मी श्वेतवर्णीय स्त्रीपासून आलो आहे. आणि मीसुद्धा श्वेतवर्णीय स्त्रीला जन्म देईन. पण, मी कोण आहे ही डोक्याची गोष्ट नाहीय . याचा अर्थ आत्मा आणि डीएनएमध्ये मी कोण आहे'. असं ती म्हणाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Entertainment, Pop star