जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Gehraiyaan च्या स्क्रिनिंगनंतर कपिल शर्मा झाला रोमँटिक, पापाराझींसमोरच पत्नीला केलं Kiss, पाहा VIDEO

Gehraiyaan च्या स्क्रिनिंगनंतर कपिल शर्मा झाला रोमँटिक, पापाराझींसमोरच पत्नीला केलं Kiss, पाहा VIDEO

Gehraiyaan च्या स्क्रिनिंगनंतर कपिल शर्मा झाला रोमँटिक, पापाराझींसमोरच पत्नीला केलं Kiss, पाहा VIDEO

‘द कपिल शर्मा शो’ फेम आणि कॉमेडियन कपिल शर्मा पत्नी गिन्नी चतरथसोबत (Kapil Sharma & Ginni Chatrath) सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसून येतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी-  ‘द कपिल शर्मा शो’ फेम आणि कॉमेडियन कपिल शर्मा पत्नी गिन्नी चतरथसोबत  (Kapil Sharma & Ginni Chatrath) सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसून येतो. तो फारच कमी पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. परंतु काल कपिल पत्नी गिन्नीसोबत मुंबईमध्ये स्पॉट झाला. इतकंच नव्हे तर दोघेही खूप रोमँटिक   (Romantic)  मूडमध्ये दिसले. दोघांनी एकमेकांचा हात धरला होता. कपिलने पापाराझींसाठी पोज देताना गिन्नीला किससुद्धा   (Kiss)  केलं. कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ दोघेही बुधवारी संध्याकाळी दीपिका पादुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवा स्टारर ‘गेहराईयां’च्या स्क्रीनिंगसाठी पोहोचले होते. यादरम्यान कपिल आणि गिनीने तेथे उपस्थित असलेल्या पापाराझींना फोटोसाठी पोज दिली. पापाराझी विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा फुल स्लीव्ह ब्लू टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये दिसत आहे. गिनीने फुल लेन्थ पुलओव्हर गाऊन परिधान केला होता. पोज देताना कपिल आणि गिन्नी दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत होते. कपिलने पापाराझींना पोज देत गिन्नीला कपाळावर किस केलं. कपिलच्या चाहत्यांना हा व्हिडीओ फारच पसंत पडत आहे. चाहते त्यांच्या जोडीचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

दीपिका पादुकोण, अनन्या पांडे, धैर्य करवा आणि सिद्धांत चतुर्वेदी गेल्या वीकेंडला ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पाहुणे म्हणून पोहोचले होते. ‘गेहराईंया’ चित्रपटाच्या प्रमोशनसोबतच हे कलाकार खूप धमाल-मस्ती करताना दिसून आले होते. दीपिका जेव्हा-जेव्हा त्याच्या शोमध्ये येते तेव्हा-तेव्हा कपिल तिच्यासोबत फ्लर्ट करत असतो. कपिलने यावेळीही असच काहीसं केलं होतं. (हे वाचा: अशी होती राहुल वैद्य-दिशा परमारची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, PHOTO आले समोर ) शकुन बत्रा दिग्दर्शित ‘गेहराईयां’ हा चित्रपट येत्या 11 फेब्रुवारी रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. दीपिका पादुकोण या चित्रपटात अलिशाची भूमिका साकारत आहे. अलिशा तिच्या चुलत बहिणीच्या बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडते. नात्यांतील गुंतागुंत उलघडणारा हा चित्रपट आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात