मुंबई 8 मार्च: अल्लू अर्जून (Allu Arjun) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या स्टाईलिश अंदाजानं प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अल्लूनं आजवर ‘येवडू’, ‘रेस गुर्रम’, ‘दुव्वावडा जगन्नाधाम’, ‘वेदम’, ‘जुलाई’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज अल्लूचा वाढदिवस आहे. (Happy Birthday Allu Arjun) 38 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आपल्या अनोख्या स्टाईलमुळं तो अल्पावधितच तरुणींच्या गळ्यातील ताईद बनला. त्याची एक झलक पाहण्यासाठी तरुणी त्याच्या घरासमोर गर्दी करतात. परंतु लाखो तरुणींना वेड लावणारा अल्लू अर्जून स्वत: मात्र स्नेहा रेड्डीच्या प्रेमात वेडा आहे. (Sneha Reddy) तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली होती. (Allu Arjun love story) पाहूया अल्लूची अनोखी लव्हस्टोरी...
अमेरिकेत एका मित्राच्या लग्नात अल्लू आणि स्नेहाची पहिली भेट झाली. अल्लू एक अभिनेता आहे हे स्नेहाला ठाऊक होतं, पण तिने त्याचा चित्रपट कधीही पाहिला नव्हता. पहिल्याच भेटीत या दोघांनीही एकमेकांची मने जिंकली. दोघेही एकमेकांशी बोलू लागले. आधी दोघांची मैत्री झाली आणि मग हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. स्नेहा हैदराबादच्या एका लोकप्रिय व्यावसायिकाची मुलगी आहे. काही वर्षांच्या नात्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अल्लूने आपल्या वडिलांना स्नेहाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन जाण्यास सांगितले. अल्लूचे वडील स्नेहाच्या घरी गेले पण तिच्या वडिलांनी त्यांच्या लग्नास नकार दिला. कारण स्नेहाचं लग्न कुठल्याही अभिनेत्यासोबत होऊ नये अशी त्यांची इच्छा होती.
अवश्य पाहा - फरहान अख्तरच्या चित्रपटात ‘मराठी’चं तुफान; अभिनेत्री मातृभाषेतच करणार संवाद
पण अल्लू आणि स्नेहा यांनी देखील लग्न करण्याचा निश्चय केला होता. एकदा तर दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा विचारही केला होता. पण अल्लूच्या कुटुंबीयांना तो विचार मान्य नव्हता. परंतु अखेर दोघांनी मिळून स्नेहाच्या वडिलांना लग्नासाठी मान्य केलंच. यानंतर 6 मार्च 2011 रोजी या दोघांनी धुमधडाक्यात लग्न केलं. या दोघांच्या नात्यातील खास गोष्ट म्हणजे स्नेहा जरी मनोरंजन विश्वातील नसली, तरीही ती अल्लूच्या व्यावसायिक जीवनाला समजून घेते आणि त्याला पाठिंबा देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Allu arjun, Bollywood News, Entertainment, Love story, Marathi entertainment, Sneha reddy