मुंबई, 21 जुलै : सध्या साऊथ सिनेमांचा बोलबाला सुरू आहे. अभिनेता प्रभासचा ‘सालार’, रजनीकांतचा ‘जेलर’, थलापति विजयचा ‘लियो’ असे अनेक सिनेमे सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातले आहेत. असं असलं तरी प्रेक्षक अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 या सिनेमाची आतूरतेने वाट पाहत आहेत. बहुप्रतिक्षित सिनेमांच्या यादीमध्ये ‘पुष्पा 2’ या सिनेमाला स्थान मिळालं आहे. पुष्पा 2 सिनेमाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत असताना सिनेमातील पहिला डायलॉग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अभिनेता अल्लू अर्जुनने स्वत: सिनेमाचा डायलॉग बोलून दाखवला आहे. पुष्पा: द राइज हा सिनेमा 17 डिसेंबर 2017ला रिलीज झाला होता. प्रेक्षकांनी सिनेमाला भरगोस प्रतिसाद दिला. सिनेमा तब्बल 352 कोटींची कमाई केली. सिनेमातील हिट गाणी आणि डायलॉग सिनेमाचे ट्रिगर पॉइंट होते. त्यामुळे आता पहिल्या सिनेमासारखी गाणी आणि हिट डायलॉग दुसऱ्या सिनेमात असणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. हेही वाचा - Tamanna bhatia : रजनिकांबरोबर काम करण्यासाठी तमन्नाला मिळाले इतके पैसे; वर सुपरस्टारनं दिलं खास गिफ्ट अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘बेबी’ हा सिनेमा रिलीज झाला. ‘बेबी’ सिनेमाच्या सक्सेस पार्टीसाठी अल्लू अर्जुन हैद्राबादमध्ये गेला होता. याच वेळी प्रेक्षकांची संवाद साधत असताना अल्लू अर्जुननं पुष्पा 2च्या एका डायलॉगची झलक प्रेक्षकांना दाखवली. एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अल्लू अर्जुन बेबी सिनेमाच्या सक्सेसचं कौतुक करतो आणि दुसऱ्या क्षणी त्याला पुष्पा 2 सिनेमाबद्दल विचारणा होते. तेव्हा अल्लू अर्जुन “आपण इथे पुष्पा 2 बद्दल बोलायला आलेलो नाही”, असं म्हणतो.
अल्लू अर्जुन पुढे म्हणतो, “मला स्वत:ला पुष्पा 2मधील एक लाइन बोलल्या शिवाय राहवत नाहीये. त्यानंतर अल्लू अर्जुन तेलुगु भाषेत पुष्पा 2 सिनेमातील एक दमदार डायलॉग बोलतो. ज्यावर प्रेक्षकांच्या कडक टाळ्या पडतात. त्या डायलॉगचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की, सगळं काही एकाच रूलमुळे आहे आणि तो रूल म्हणजे पुष्पा”.
मिळालेल्या माहितानुसार, अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षीत पुष्पा 2 हा सिनमा 2024मध्ये रिलीज होणार आहे. सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री समांथा रूथ प्रभूची तब्येत ठीक नसल्याने तिनं कामातून ब्रेक घेतला आहे. समांथा ऐवजी सिनेमात आयटम साँगसाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि दिशा पाटणी यांची नावं चर्चेत आहेत.