मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं; सांगितलं थक्क करणारं कारण...

अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं; सांगितलं थक्क करणारं कारण...

जवळपास एक दशक रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अलका बॉलिवूडमधून एकाएकी गायब का झाल्या? आज त्यांचा 55 वा वाढदिवस आहे. या निमित्तानं जाणून घेऊया त्यांच्या करिअरविषयी...

जवळपास एक दशक रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अलका बॉलिवूडमधून एकाएकी गायब का झाल्या? आज त्यांचा 55 वा वाढदिवस आहे. या निमित्तानं जाणून घेऊया त्यांच्या करिअरविषयी...

जवळपास एक दशक रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अलका बॉलिवूडमधून एकाएकी गायब का झाल्या? आज त्यांचा 55 वा वाढदिवस आहे. या निमित्तानं जाणून घेऊया त्यांच्या करिअरविषयी...

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 20 मार्च: अलका याग्निक (Alka Yagnik) या बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय गायिकांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर  90च्या दशकात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ‘एक दो तीन’, ‘ऐ मेरे हमसफर’, ‘टीप टीप बरसा पानी’ (‘Ek Do Teen’, ‘Ai Mere Humsafar’, ‘Tip Tip Barsa Pani’ ) यांसारखी शेकडो सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहे. परंतु जवळपास एक दशक रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अलका बॉलिवूडमधून एकाएकी गायब का झाल्या? आज त्यांचा 55 वा वाढदिवस आहे. या निमित्तानं जाणून घेऊया त्यांच्या करिअरविषयी...

अलका याग्निक यांचा जन्म 20 मार्च 1966 साली कोलकातामधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांची आई शास्त्रीय गायक होती. त्यामुळं आईकडूनच त्यांनी गाण्याचे प्राथमिक धडे गिरवले. वयाच्या 10 व्या वर्षी कोलकातामधील एका रेडिओ वाहिनीसाठी गाणी गाऊन त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे 14व्या वर्षी आईसोबत त्या मुंबईत आल्या अन् त्यांनी राज कपूर यांची भेट घेतली. त्यांचा सुरेल आवाज ऐकून राज कपूर देखील थक्क झाले. त्यांनी खुश होऊन अलका यांना पायल की झन्कार या चित्रपटात थिरकत अंग लचक झुकी हे गाणं गाण्याची संधी दिली. त्यानंतर लावारीस चित्रपटात त्यांनी मेरे अंगने मे हे गाणं गायलं. त्याकळी अलका याग्निक यांचा आवाज अनेक संगीतकारांना आवडत होता. परंतु त्यांनी अपेक्षित असलेली संधी काही मिळत नव्हती. त्यामुळं मुंबई सोडून त्यांनी पुन्हा कोलकाताला जाण्याचा निर्णय घेतला होता.

अवश्य पाहा - ‘खरंच सायली कांबळे गरीब आहे का?’; इंडियन आयडल का करतंय प्रेक्षकांची फसवणूक

तेवढ्यात तेजाब या चित्रपटात एक दोन तीन हे गाणं गाण्याची संधी त्यांना मिळाली. माधुरी दिक्षितचा जबरदस्त डान्स आणि अला याग्निक यांना आवाज यामुळं हे गाणं सुपरहिट झालं. अन् या गाण्यानं अलका आग्निक रातोरात सुपरस्टार झाल्या. पुढे बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांध्ये गाणी गाण्याची संधी त्यांना मिळाली.

अवश्य पाहा - फाटलेल्या जीन्सवरुन स्वरा भास्करनं घेतली RSSची फिरकी; म्हणाली...

परंतु इतकी लोकप्रियता मिळूनही अलका आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नाहीत. कारण आता रिमेक गाण्यांचा जमाना आला आहे. गाण्यांमध्ये अश्लिल शब्द वापरले जातात. शिवाय रॅपिंगच्या नावाखाली ऑटोट्यून केलं जातं. अन् अशा प्रकारची गाणी त्यांना गाता येत नाही. ज्या गाण्यांचा अर्थच आपण चारचौघात सांगू शकत नाही ती गाणी कशी गायची असा प्रश्न त्यांना पडतो त्यामुळं त्यांनी बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्या लहानमोठे शो करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.

First published:

Tags: Alka yagnik, Bollywood, Bollywood actress, Entertainment, Marathi entertainment