मुंबई 19 मार्च: गेल्या काही काळात टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या रिअलिटी स्पर्धांचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. विशेष करुन डान्स आणि गाणं या प्रकारातील शो मोठ्या प्रमाणावर दाखवले जातात. या शोमध्ये झळकणारे कलाकार अत्यंत गरीब असतात. या शोनं त्यांना आपली कला सादर करण्याची संधी दिली अन् आता ते सेलिब्रिटी झाले आहेत. अशी पटकथा प्रेक्षकांना जवळपास प्रत्येक शोमध्ये पाहायला मिळते. परंतु इंडियन आयडलमध्ये (Indian Idol 12) घडलेल्या या प्रकारामुळं खरोखरंच ते कलाकार गरीब असतात का? की निव्वर प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी केली जाते? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
अवश्य पाहा - ‘…अन्यथा तुम्ही बाहेर फेकले जाल’; कियारानं दाखवली बॉलिवूडची जीवघेणी स्पर्धा
इंडियन आयडलचा 12 वा सीझन सुरु आहे. (Indian Idol 12) या सीझनमध्ये सायली कांबळे (Sayli Kamble) नावाची एक स्पर्धक आहे. ही तरुणी अत्यंत गरीब आहे. इतकी की तिच्या घरात साधा टीव्ही देखील नाही. तिचे वडिल रुग्णवाहिका चालवतात. अन् बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही तिनं इंडियन आयडलच्या मंचापर्यंत झेप घेतली. ही स्पर्धा जिंकण हेच तिचं ध्येय आहे. असा दावा या शोच्या निर्मात्यांनी केला होता. मात्र सायलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यासोबत स्टेजवर गाणं गाताना दिसत आहे. अन् हा व्हिडीओ पाहिल्यावर ती खरंच इतकी गरीब आहे का? असा सवाल नेटकरी करत आहेत.
अवश्य पाहा - ‘हे बुटी शेक काय आहे?’ आशा भोसलेंच्या आवाजात जॅमीनं उडवली टोनीची खिल्ली
जी तरुणी सुरेश वाडकर यांच्यासोबत स्टेजवर गाणं गाते ती नक्कीच छोटी कलाकार नाही. इतक्या तयारीच्या आधीच प्रसिद्ध असलेल्या कलाकारांनाच संधी द्यायची असते तर मग तुम्ही ऑडिशन का घेता? असा सवाल नेटकरी शोच्या निर्मात्यांना करत आहेत. यापूर्वी असाच काहीसा प्रकार गायक सवाई भट्टसोबत करण्यात आला होता. त्यामुळं रिअलिटी शोंच्या प्रामाणिकपणावर आता संशय व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Live video viral, Marathi entertainment