मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alka Kubal: अलका ताईंनी बनवलं झणझणीत कोळंबी कालवण! लंडनमध्ये रंगली खास मेजवानी

Alka Kubal: अलका ताईंनी बनवलं झणझणीत कोळंबी कालवण! लंडनमध्ये रंगली खास मेजवानी

अभिनेत्री अलका कुबल  नव्या सिनेमातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सिनेमाचं शुटींग लंडनमध्ये सुरू आहे. लंडनमध्ये अलका ताईंनी थेट कोलंबी कालवणाची मेजवानी आयोजित केली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 14 जुलै: अभिनेत्री अलका कुबल अनेक वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत. अनेक वर्ष त्या पडद्यामागे काम करत होत्या. मात्र अभिनयाची ओढीनं त्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर यायला भाग पाडलं आहे.  आई माझी काळुबाई या मालिकेची निर्मिती त्यांनी केली. त्यात काळुबाईची भूमिका देखील करत होत्या. आता त्या लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'congratulations' या आगामी सिनेमात दिसणार आहेत. सिनेमाच्या शुटींगला देखील सुरुवात झाली. लंडनमध्ये सिनेमाचं शुटींग सुरू असून कलाकार नुकतेच लंडनमध्ये दाखल झाले आहेत. अलका कुबल या फार सुंदर अभिनेत्री आहेत. हे सर्वांना माहितीच आहे मात्र त्या उत्तम माणूस आणि उत्कृष्ट कुक देखील आहेत. त्यांच्या हातचं जेवणं संपूर्ण मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे. त्या प्रचंड फुडी देखील आहेत. आता लंडनमध्ये शुट सुरू आहे म्हटल्यावर अलका ताई शांत कशा राहतील. अलका ताईंच्या पुढाकारानं लंडनमध्ये कोळंबी कालवणाची लज्जत मेजवानी रंगली. दिग्दर्शक लोकेश गुप्तेनं अलका ताईंचा व्हिडीओ शेअर केला आहे. लंडनमध्ये शुटींग संपल्यानंतर अलका ताईंनी स्वत: च्या हातानं कोळंबी कालवण बसून सगळ्या टीमला खाऊ घातलं. शुटींग दरम्यान कलाकारांना सगळ्या सुख सोयी आयत्या मिळत असताना देखील अलका ताईंनी स्वत:च्या हातानं घरच्या चवीचं जेवण मोठ्या प्रेमानं सगळ्यांना खाऊ घातलं. लोकेशनं त्यांच्या याच स्वभावाचं मोठं कौतुक करत त्यांचा व्हिडीओ शेअर केलाय. लोकेशनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अलका ताई एँप्रन घालून कोळंबीचं कालवण करत आहेत. मोठाली कोळंबी मोठ्या कालवणाच्या रस्स्यात टाकताना दिसत आहेत. त्यांच्या हा व्हिडीओ पाहून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे.
हेही वाचा - Chala Hava Yeu Dyaच्या मंचावर शाहाजी बापू पाटलांचं स्वागत एकदम ओक्केमध्ये; कलाकार सादर करणार धमाल गाणं लोकेशनं व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, 'काल शूटिंग थोडे लवकर संपल्यावर एखादिनी आराम केला असता रूम वर जाऊन. पण छे... मार्केटमध्ये जाऊन कोळंबी आणून ती रूमवर साफ करुन आज सगळ्यांना स्वतःच्या हातचे कालवण खाऊ घातले. अलका ताई तुस्सी ग्रेट हो. दीड महिन्यांनी घरचे जेवण जेवल्याचं समाधान मिळाले'. अलका ताईंचं कौतुक करत सगळे लोकेशच्या बायकोला म्हणजेच अभिनेत्री चैत्रालीला देखील मिस करत आहेत हे ही त्यांनं सांगितलं आहे.  त्यावर चैत्रालीनं कमेंट करत 'वॉव मज्जा आहे सगळ्यांची. पण मला तुम्ही मिस करत आहात हे बघून जास्त छान वाटलं', असं म्हटलं आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या congratulations या सिनेमा अलका कुबल, सिद्धार्थ चांदेकर, पुजा सावंत हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेता लोकेश गुप्ते सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.
First published:

Tags: London, Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

पुढील बातम्या