S M L

पाकिस्तानी झेंडा हातात घेऊन दिसली राखी सावंत, चाहते म्हणाले गद्दार

'मी या सिनेमात एक पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारत आहे आणि पाकिस्तानी लोकांकडेही चांगलं मन आहे.' असं राखीनं म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 9, 2019 03:10 PM IST

पाकिस्तानी झेंडा हातात घेऊन दिसली राखी सावंत, चाहते म्हणाले गद्दार

मुंबई, 9 मे : कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडियावरील एका फोटोमुळे वादात सापडली आहे. या फोटोमध्ये राखी पाकिस्तानचा झेंडा हातात घेतलेली दिसत आहे. या फोटोला राखीनं, 'मी माझ्या भारत देशावर खूप प्रेम करते, पण हा माझा 'धारा 370' या सिनेमातील लुक आहे.' असं कॅप्शन दिलं आहे. या सिनेमासाठी राखी पाकिस्तानी झेंडा हातात घेऊन दिसत आहे. राखीनं या फोटो मागचं कारण सांगितलं तरीही चाहते मात्र तिचं हे कारण ऐकून घ्यायला तयार नाहीत. त्यांनी या फोटोवरून राखीला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

राखी सावंतनं काही नुकताच एक फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला ज्यात ती पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन उभी असलेली दिसत आहे आणि यावरून आता अनेक वाद सुरू झाले आहेत. राखीच्या चाहत्यांनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. एका युजरनं लिहिलंय, 'तू पाकिस्तानची नागरिक म्हणून परफेक्ट आहेस. मिस राखी 'पाकिस्तानी' सावंत.' तर जहरीली गर्ल नावाच्या एका युजरनं, 'पैशांसाठी दुश्मान देशाचा झेंडा हातात घेशील का ? विश्वासघातकी मुली.' अशी कमेंट केली आहे.

View this post on Instagram

I love my india 🇮🇳 but its my character in the film 🎥 dhara 370

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) onकाही युजर्सनी लिहिलंय, 'आता तर हद्दच झाली, थोडी तरी लाज बाळग. तुला आम्ही नेहमी सपोर्ट करतो. पण तू अशा गोष्टी करू नको ज्यामुळे आम्ही तुला सपोर्ट केला याची आम्हालाच लाज वाटेल.' तर एका युजरनं, 'तू आतापर्यंत केलेली सर्व वाईट काम विसरुन जाऊ पण ही अजिबात योग्य नाही' असं लिहिलं आहे. काही  युजर्सनी  राखीला अनफॉलो केलं असून काहीनी तिला अनफॉल करायची धमकी दिली आहे. तर काहींनी राखीला चक्क मूर्ख म्हटलं आहे.

या सर्व प्रकारावर राखील स्पष्टीकरण दिलं असून ती म्हणते, 'मी या सिनेमात एक पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारत आहे आणि पाकिस्तानी लोकांकडेही चांगलं मन आहे. ते खूप चांगले आहेत. सर्व लोक वाईट नाहीत.' राखीच्या चाहत्यांना तिचं हे स्पष्टीकरण कितपत पटेल हे माहित नाही. पण या फोटोमुळे राखीला पुन्हा एकदा चर्चेत येण्याची संधी मिळाली हे मात्र नक्की.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2019 03:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close